अण्णांनी दार उघडले अन् चोरट्यांनी मानेवर चाकूच लावला, येरमाळ्यात नऊ लाखांची जबरी चोरी!  | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

yermala.jpg

येरमाऴ्यात चाकूचा दाखवून नऊ लाखांची जबरी चोरी  

अण्णांनी दार उघडले अन् चोरट्यांनी मानेवर चाकूच लावला, येरमाळ्यात नऊ लाखांची जबरी चोरी! 

येरमाळा (उस्मानाबाद) : आण्णा, आण्णा दार उघडा असा आवाज आला. अन् अण्णांनी दार उघडताच अण्णांच्या गळ्यावर धारदार सुरा ठेऊन अज्ञात चार जणांनी घरात प्रवेश केला. अवघ्या पाच मिनिटात कपाटातील रोख व अण्णांच्या पत्नीच्या अंगावरील व कपाटातील सोने असा मिळुन 9 लाख 95 हजारांचा ऐवज चोरट्यांनी शस्त्रांचा धाक दाखवत अवघ्या पाच मिनिटात चोरुन नेला. हा प्रकार तेरखेडा (ता.वाशी) येथील किराणा दुकानाचे व्यापारी शंकर मुरलीधर वराळे यांच्या घरी बुधवारी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास घडला. या बाबत येरमाळा पोलिस ठाण्यात अज्ञात चार जनांवर गुन्हा दाखल केला आहे. 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!


तेरखेडा (ता.वाशी) येथील मुख्य बाजारपेठेत शंकर वराळे यांचे दोन दुकाने आहेत. या दोन्ही दुकानाच्या मध्यभागी असलेल्या चैनल गेटचे कुलूप तोडून चोरट्यांनी दुकानाच्या मागे असलेल्या घरात प्रवेश केला. सध्या दिवाळी सिझन असल्याने बुधवारी रात्री उशीरा दुकान बंद करुन शंकर वराळे व कुटूंबीय झोपले होते. रात्री दोन वाजेच्या सुमारास आण्णा, आण्णा दार उघडा आम्हाला साखर पाहिजे, असा आवाज दिल्याने अण्णांनी दार उघडताच अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळ्यावर धारदार सुरा लावला. आणि आवाज केला तर तुमचा जीव घेऊ अशी धमकी दिली. कांही बोलण्या पूर्वी कपाटातील रोख ४ लाख ७० हजार सोने व त्यांच्या पत्नीच्या अंगावरील सोन्याचे दागिने अंदाजे दहा तोळे असा ९ लाख ९५ हजाराचा ऐवज अवघ्या पाच मिनिटात चोरुन पळ काढला. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

शंकर वराळे सोडता घरात लहान मुल, महिला सदस्य असल्याने डाव साधल्याची तेरखेडा ग्रामस्थांतून चर्चा व्यक्त केली जात आहे. सदरील घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक पंडित सोनवणे यांनी घटनास्थळी धाव घेतली. सकाळी श्वान पथकाकडून तपासाचे काम सुरु होते. सकाळी ७:३० वा. गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पो उपनिरिक्षक नाईकवाडी करीत आहेत. घटनेची माहिती मिळताच सकाळी आठ वाजता कळंबचे उपविभागीय पोलीस अधिकारी शशीकरण काशीद व सकाळी दहा वाजता पोलीस अधीक्षक राजतीलक रोशन यांनी घटनास्थळी भेटी दिल्या आहेत. 

(संपादन-प्रताप अवचार)

loading image
go to top