चेकपोस्‍टवरील कर्मचारी गिरवताहेत योगाचे धडे

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 13 May 2020

रामेश्वर येथील चेकपोस्‍टवर सकाळ ते सायंकाळी कर्मचारी  कर्तव्य पार पाडत आहेत. यातील ग्रामसेवक सुनील मुळे हे योग शिक्षक आहेत. ते नियमित कर्मचाऱ्यांना योग व प्राणायामचे धडे देत आहेत.

हिंगोली : कोरोनाच्या प्राश्वभूमीवर लॉकडाउन, संचारबंदी, सीमाबंदी सुरू आहे. जिल्‍ह्यातील मुख्य मार्गावर चेकपोस्‍ट करण्यात आले आहेत. येथे कर्मचाऱ्यांच्या नियुक्‍त्‍यादेखील करण्यात आल्या आहेत. रामेश्वर (ता. औंढा नागनाथ) येथील कर्मचाऱ्यांना पहाटे पाच ते सहा या वेळात योगाचे धडे दिले जात आहे.

कोरोनाच्या पाश्चभूमीवर जिल्‍ह्यातील प्रमुख मार्गावर तपासणी नाके तयार करण्यात आले आहेत. येथे पोलिस, आरोग्य कर्मचाऱ्यांसह शिक्षक व ग्रामसेवकांच्या नियुक्‍त्‍या करण्यात आल्या आहेत.  यातील काही कर्मचाऱ्यांना दिवसा तर काही कर्मचाऱ्यांची रात्रीची नियुक्ती करण्यात आली आहे.

हेही वाचा आवाजाचे गुढ उकलेना, हिंगोली जिल्ह्यात पुन्हा हादरे...

ग्रामसेवकांसह शिक्षकांची नियुक्ती

  रामेश्वर (ता. औंढा नागनाथ) येथील चेकपोस्‍टवर ग्रामसेवक सुनील मुळे, राजेश बर्वे, आरोग्य कर्मचारी एम. एस. देशमुख, विजय मोरे, श्री. खिल्लारे, पोलिस कर्मचारी टी. एस. बेद्रे, एम. बी. पवार, बाबूराव चव्हाण, गिरधारी कीर्तने, अतुल बोरकर यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे.

सकाळी योग व प्राणायाम

सकाळ ते सायंकाळी हे कर्मचारी चेकपोस्‍टवर कर्तव्य पार पाडत आहेत. यातील ग्रामसेवक सुनील मुळे हे योग शिक्षक आहेत. हिंगोली शहरात योगाचे धडे नियमित देतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या शहरातील योग वर्ग बंद असल्याने ते त्यांच्या घरीच सकाळी योग व प्राणायाम करतात. त्‍यांची नियुक्‍ती रामेश्वर येथील चेकपोस्‍टवर करण्यात आली आहे.

प्रतिकार शक्‍ती वाढण्यासाठी फिटनेसचे धडे

 येथे कधी सकाळी, तर कधी रात्री ड्युटी लागते. रात्री ड्युटी केल्यानंतर सकाळी कर्मचाऱ्यांना ते नियमित योग व प्राणायमाचे धडे देत आहेत. काम करताना दिवभर उत्साह वाटावा यासाठी येथे नियुक्त कर्मचाऱ्यांरीदेखील चेकपोस्‍ट सांभाळत पहाटे पाच ते सहा या वेळात योग व प्राणायाम करण्यासाठी पुढाकार घेत आहेत. शरीरातील प्रतिकार शक्‍ती वाढण्यासाठी व दिवसभर ताजेतवाने राहण्यासाठी योग व प्राणायम महत्त्वाचे असल्याचे श्री. मुळे यांनी सांगितले.

येथे क्लिक करा - हिंगोलीत १८ जवानांनी जिंकले ‘कोरोना युद्ध’

विलगीकरण कक्षातील नागरिकांची तपासणी

हिंगोली : नांदापूर (ता. कळमनुरी) येथील जिल्‍हा परिषद शाळेत करण्यात आलेल्या विलगीकरण कक्षात बाहेर गावातून येणाऱ्या गावकऱ्यांना थांबावे लागत आहे. येथे तयार करण्यात आलेल्या कक्षात बुधवारी (ता.१३) सकाळी दहा वाजता औरंगाबाद येथून दोन, गुजरात राज्यातून दोन व पुणे येथून आलेला एक अशा एकूण पाच जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे.

कर्मचाऱ्यांची उपस्थिती 

 या वेळी श्रीमती बाभुळकर, विजय मुधोळ, श्रीमती चंदेल, मुख्याध्यापक श्री. बोरकर, आशा वर्कर सरिता मोरे, उज्‍वला देगावकर, शेख मदिना, पिंटू बोरकर आदी कर्मचारी उपस्‍थित होते. बाहेरुन आलेल्या ग्रामस्थांची तपासणी केल्यानंतर त्यांना १४ दिवस शाळेतच ठेवल जात आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Yoga lessons in the work of checkposted staff Hingoli news