‘तु’ दीडदमडीचा पोलिस आहेस म्हणून...!

file photo
file photo

नांदेड : लॉकडाऊनच्या काळात तोंडाला मास्क न लावता व संचारबंदी आदेश झुगारून विनाकारण शहरातून दुचाकीवरुन फिरणाऱ्या एका युवकास थांबविणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यासच त्याने धक्काबुक्की करून शासकिय कामात अडथळा निर्माण केला. हा प्रकार बिलोली शहरात रविवारी (ता. पाच) सायंकाळी सातच्या सुमारास घडला. 

कोरोना या महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून लॉकडाऊनचा आदेश सक्तपणे पाळला जात आहे. या काळात संचारबंदी असल्याने अत्यावश्‍यक सेवा पुरविणारी मंडळीच घराबाहेर पडत आहे. मात्र काही मंडळी विनाकारण घराबाहेर पडत आहेत. असाच एक तरूण शहरातून तोंडाला मास्क न वापरता विनाकारण फेरफटका मारत असल्याचे कर्तव्यावरील पोलिसांना दिसला. पोलिसांनी शिवा मोहण कोरोड रा. बिलोली याला थांबविले. कर्तव्यावरील पोलिस कर्मचारी अब्दुल वाजीद यांनी त्याच्याकडे असलेल्या दुचाकीची कागदपत्रे मागितली. यावेळी त्यांने उडवाउडवीचे उत्तरे दिली. 

कॉलर पकडून धक्काबुक्की केली

एवढेच नाही तर तु दीडदमडीचा पोलिस आहेस असे म्हणून त्यांच्यासोबत त्याने वाद घातला. त्यांच्या अंगावर हात घालून कॉलर पकडून धक्काबुक्की केली. तसेच तु बिलोलीत ड्युटी कसा करतोस ते मी पाहतो अशी धमकी देऊन शासकिय कामात अडथळा निर्माण करून जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची पायमल्ली केली. तसेच परिसरात दहशत पसरविली. यावरून पोलिस हवालदार अब्दुल वाजीद अब्दुल वहीद यांच्या फिर्यादीवरुन बिलोली पोलिस ठाण्यात शिवा कोरोडविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. केंद्रे करत आहेत. 

नीळकंठ कुलकर्णी सेवानिवृत्त

नांदेड : येथील दिवाणी वरिष्ठस्तर न्यायालयात कार्यरत असलेले निम्नश्रेणी लघूलेखक नीळकंठ बालकिशनराव कुलकर्णी हे प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले आहेत. 

नीळकंठ कुलकर्णी यांनी जिल्ह्यातील विविध न्यायालयांत लघूलेखक म्हणून 35 वर्षांची सेवा बजावली. ता. एक एप्रिल रोजी नियत वयोमानानुसार ते सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त न्यायमूर्ती, अनेक अधिकारी, नातेवाईक यांनी भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com