बेरोजगारीमुळे तरुणाने केली आत्महत्या, दोनच दिवस मिळत होते काम

अनिल राऊत
अनिल राऊतसकाळ

आखाडा बाळापुर (जि.हिंगोली) : आखाडा बाळापुर (ता.कळमनुरी) (Kalamnuri) येथील एका तरुणाने बेरोजगारीला (Unemployment) कंटाळून आत्महत्या केल्याची घटना रविवारी (ता.२५) घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. अनिल गंगाधर राऊत (वय २८, रा.आखाडा बाळापू) हा मागील काही दिवसांपासून काम नसल्याने व आठवड्यात फक्त दोनच दिवस काम मिळत असल्याने उर्वरित दिवस रिकाम्या राहत असल्याने या मानसिक ताण-तणावातून तसेच आईवडील, बहिणीच्या सांभाळ कसा करावा, या टेन्शनमध्ये तो होता. बेरोजगारीला कंटाळून अनिल राऊत याने आपली जीवनयात्रा संपविली आहे. यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत आखाडा बाळापूर पोलिस स्थानकामध्ये (Akhada Balapur Police Station) गंगाधर राऊत यांनी माहिती दिल्याने आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक रवी हुंडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली संजय मार्के हे करित आहेत.(yought committed suicide due to unemployment in kalamnuri tahsil hingoli news glp88)

अनिल राऊत
मरणार असलो तरी तुम्ही चांगले जगा! मित्रांना पाठवला शेवटचा निरोप

दरम्यान, बेरोजगारीला कंटाळून (Crime In Hingoli) आत्महत्या केलेल्या अनिल राऊत यांची घरची परिस्थिती अत्यंत बिकट असून घरी अठराविश्व दारिद्र्य आहे. तसेच वडील मोलमजुरी करतात. आई घरीच असते. एक विवाहित बहीण आहे. ती माहेरीच असते. तसेच अनिलला दोन मोठे भाऊ असून ते कामानिमित्त बाहेर गावी राहतात. कुटुंबाचा भार अनिलवरच असल्याने आपल्या मोलमजुरी करून घरचा उदरनिर्वाह कसे होईल, या मानसिक अस्वस्थतेमुळे अनिलने जीवनयात्रा संपविल्याचे त्याच्या जवळचे नातेवाईक मित्रमंडळीने सांगितले. अनिल सर्वांशी मिळून मिसळून राहणारा व अडचणीत नेहमी मदत करणारा असल्याचे त्याच्या मित्रांनी सांगितले. तसेच बेरोजगारीत आई-वडिल, बहिणीचं जबाबदारी यामुळेच अनिलने लग्न केले नसल्याचेही त्याचे मित्र सांगतात. त्याच्या पश्चात आईवडील, दोन भाऊ, एक बहीण असा परिवार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com