esakal | कर्जाला कंटाळून बदनापूर तालूक्यात तरुण शेतकऱ्याची आत्महत्या! 
sakal

बोलून बातमी शोधा

sagar Jarwal.jpg

सहा लाखांचे कर्ज, त्यात अतिवृष्टीने पीकही गेले. आर्थिक संकट ओढावतच गेले. कर्ज कसे पेडायचे ही विवंचना मनाला सतावत होती. अखेर युवा शेतकरी गोपाल जारवाल यांनी टोकाची भूमिका घेतली. मध्यरात्री शेतात जाऊन विष प्राषाण केले. ही बाब समोर येताच सागर यांना जालन्यातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचार सुरु असताना अखेर प्राणज्योत मालवली.  

कर्जाला कंटाळून बदनापूर तालूक्यात तरुण शेतकऱ्याची आत्महत्या! 

sakal_logo
By
आनंद इंदानी

बदनापूर (उस्मानाबाद) : सागरवाडी (जिल्हा जालना) येथील पंचवीस वर्षीय तरुण शेतकऱ्याने अतिवृष्टीने पिकांचे झालेले नुकसान आणि कोरोनाच्या काळात ओढावलेल्या आर्थिक संकटाला कंटाळून सोमवारी (ता.16) मध्यरात्री स्वतःच्या शेतात विष प्राशन केले होते. दरम्यान, उपचार सुरू असताना त्याचा गुरुवारी (ता.19) मृत्यू झाला. या परिस्थितीत बँकेचे सहा लाख रुपयांचे कर्ज कसे फेडावे? अशी विवंचना त्यास सतावत होती. 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

सागरवाडी येथील गोपाल डोंगरसिंग जारवाल यांची सागरवाडी शिवारातील गट क्रमांक 295/297 मध्ये एकूण 2 हेक्टर 35 आर जमीन आहे. त्यात मोठ्या अपेक्षेने खरीप पिकांची लागवड केली होती. मात्र यंदा कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि त्यातच अतिवृष्टीने होत्याचे नव्हते केले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या स्वप्नावर पाणी फेरले. अशा परिस्थितीत लाडसावंगी (जिल्हा औरंगाबाद) येथील महाराष्ट्र बँकेकडून घेतलेले सहा लाख रुपयांचे पीककर्ज कसे फेडावे? अशी चिंता त्यास सतावत होती. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.


अखेर याच विवंचनेत त्याने सोमवारी रात्री उशीरा विषप्राशन केले. ही बाब घरच्यांच्या लक्षात आल्यानंतर तत्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र गुरुवारी (ता.19) सकाळी त्याचा मृत्यू झाला. गोपाल जारवाल याच्या आईवडीलांचे दहा वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता. त्यामुळे त्याच्यावर बहिणीचे लग्न करण्यासह कुटुंबाची सर्वस्वी जबाबदारी होती. त्यातच ही दुर्दैवी घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

(संपादन-प्रताप अवचार)