अतिवृष्टी अन् कोरोनाचा फटका, तरुण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या | Farmer Suicide In Beed | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Farmer Suicide And Beed News

अतिवृष्टी अन् कोरोनाचा फटका, तरुण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या

जातेगाव (जि.बीड) : अतिवृष्टीत केळी आणि खरिप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने करण्यात आलेला खर्च पदरात पडला नाही. शिवाय दोन वर्षांपासून कोरोना साथीने विम्याचे काम मंदावल्याने आर्थिक अडचणीत सापडलेल्या तरुण शेतकरी यांनी गळफास घेऊन आत्महत्या (Farmer Suicide In Beed) केल्याची घटना सोमवारी (ता.दहा) रामपुरी (ता.गेवराई) येथे घडली. अशोक बाजीराव पवार (वय ३९, रा.रामपुरी) असे नाव आत्महत्या केलेल्या तरुण शेतकऱ्याचे आहे. पाच एकर जमिनीत दहा -बारा जणांच्या कुटुंबाचा प्रंपच चालणे कठीण होत असल्याने शेती करुन पाच वर्षांपासून विमा कंपनीच्या एजंट यांच्या अधिपत्याखाली काम करत असतानाच अशोक पवार विमा एजंट झाले. (Young Farmer Hanged Himself In Beed District)

हेही वाचा: हिंगोलीत वैध कारणाशिवाय सरकारी कार्यालयात प्रवेश नाही, पोलिसही तैनात

यामुळे कुटुंबीयाला आर्थिक अडचणीस हातभार मिळु लागला. पुढे भाऊ विभक्त झाला. आई, वडील, पत्नी आणि तीन मुलांची जबाबदारी त्यांच्यावर आली. शिवाय दोन वर्षांपासून कोरोना साथीने विम्याचे काम मंदावले. परिणामी भाव वाटणीने आलेल्या अडीच एकर जमिनीपैकी एक एकर केळी लागवड करुन उर्वरित दीड एकरात खरिप पिक घेतले. परंतु अतिवृष्टीने केळी बाग उद्ध्वस्त झाली. खरिप हंगामातील कापूस, सोयाबीन खरडून गेली. केळी बागेस व खरिप पिकास केलेला खर्च पदरात पडला नाही. विम्याचा व्यवसायाला कोविड (Corona) मुळे लगाम बसला. आर्थिक चणचण निर्माण होऊ लागली. आता मुलांचे शिक्षण कसे होणार याची चिंता अशोक पवार यांना गेल्या एक महिन्यापासून सतावत होती.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top