ती त्वचेच्या उपचारासाठी डॉक्टरकडे गेली, पण...

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 फेब्रुवारी 2020

किनवट : त्वचेची समस्या असल्याने उपचार घेण्यासाठी शहरातील आंबेडकर चौक परिसरातील एका खासगी रुग्णालयात गेलेल्या वीस वर्षीय आदिवासी तरुणीचा डाॅक्टरने विनयभंग केल्याची घटना शनिवारी (ता.१५) दुपारी घडली.या प्रकरणी पिडित तरुणीच्या फिर्यादीवरून रात्री उशीरा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. 

किनवट : त्वचेची समस्या असल्याने उपचार घेण्यासाठी शहरातील आंबेडकर चौक परिसरातील एका खासगी रुग्णालयात गेलेल्या वीस वर्षीय आदिवासी तरुणीचा डाॅक्टरने विनयभंग केल्याची घटना शनिवारी (ता.१५) दुपारी घडली.या प्रकरणी पिडित तरुणीच्या फिर्यादीवरून रात्री उशीरा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. 

तालुक्यातील थारा (ता.किनवट) येथील आदिवासी समाजाची तरुणी गोकुंदा येथे किरायाच्या खोलीत राहून येथीलच एका अकॅडमीत पोलिस भरती पूर्व प्रशिक्षण घेत आहे. त्वचेची समस्या असल्याने पीडित वीस वर्षीय तरुणीचे शहरातील नागरगोजे रुग्णालयात उपचार चालू होते. 

हेही वाचा - त्याने तिला टहाळ खायला बोलावले अन्...

गुन्हा नोंदविण्याची चाहुल लागल्याने आरोपी झाला फरार 

शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास ती तरुणी आपल्या एका मैत्रिणीसोबत रुग्णालयात गेली असता डॉ. नागरगोजे यांनी तरुणीच्या मैत्रिणीस कॅबिन बाहेर पाठवून, पीडितेचा हात हातात घेऊन फ्रेंडशिप करण्यास सांगितले व मिठी मारून विनयभंग केला. याबाबतची फिर्याद पीडित तरुणीने किनवट पोलिस ठाण्यात दुपारीच दिली.

गुन्हा नोंदविण्यापूर्वी पोलिस ठाण्यात आलेल्या आरोपीस गुन्हा नोंदविण्याची चाहुल लागल्याने आरोपी फरार झाला आहे. या प्रकरणी पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यावरून आरोपी डॉक्टरविरुद्ध विनयभंग व अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा अट्रोसिटी कायद्यानुसार रात्री उशिरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तपास उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार नाईक हे करीत आहेत. 

हेही वाचा - राष्ट्रीय महामार्ग 222वर भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू

दयानंद राजुळे याच्या पोलिस कोठडीत वाढ

बिलोली ः शंकरनगर येथील श्री साईबाबा प्राथमिक विद्यालयातील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी दयानंद राजुळे याच्या पोलिस कोठडीत चार दिवसांची वाढ करण्यात आली असून मंगळवारी (ता.१८) पर्यंत पोलिसांची चौकशीची मुदत असणार आहे.

शंकरनगर येथील श्री साईबाबा प्राथमिक विद्यालयात (ता.१७) डिसेंबर रोजी सहाव्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या एका अल्पवयीन मुलीवर दोन शिक्षकांकडून लैंगिक अत्याचार झाल्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर रामतिर्थ पोलिस ठाण्यामध्ये सय्यद रसुल, दयानंद राजुळे या दोन शिक्षकांसह प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रदीप पाटील व माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य धनंजय शेळके यांच्यासह मध्यान भोजन शिजवून देणारी महिला अशा पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तीन आरोपींना पोलिस कोठडीनंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. तदनंतर मुख्य आरोपी असलेला दयानंद राजुळे यास अटक झाल्यानंतर बिलोलिच्या जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश विक्रमादित्य मांडे यांनी आरोपीस पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Young woman undergoes doctor's treatment for dermatological treatment