esakal | राष्ट्रीय महामार्ग 222वर भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

Beed News
  • भरधाव कार-दुचाकीचा अपघात
  • टाकरवन फाट्यानजीकची घटना

राष्ट्रीय महामार्ग 222वर भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

माजलगाव (बीड) : भरधाव मारुती कार आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (ता.१५) रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील टाकरवन फाट्याजवळ घडली.

संतोष राऊत, गणेश देवकर (रा. वाहेगाव आम्ला, ता. गेवराई, जिल्हा बीड) अशी अपघातात ठार झालेल्या तरुणांची नावे आहेत.

परीक्षेत पास करतो, म्हणून तिला एकटीलाच बसवले वर्गात

याबाबत अधिक माहिती अशी, की मारुती कार (क्रमांक एम.एच.२६-बी.सी.-३३३९) ही राष्ट्रीय महामार्ग २२२ वरून गढीहुन माजलगावच्या दिशेने भरधाव येत होती. याच वेळी दुचाकी (क्रमांक एम.एच.२३-एल.२९६१) वरून संतोष राऊत, गणेश देवकर हे दोन तरुण माजलगावाहून गेवराईकडे भरधाव वेगाने जात होते.

आमचे जुळले, तुमचे कसे जुळले जरा सांगा की...

माजलगाव शहरापासून 23 किलोमीटर अनंतराव तालखेड ते टाकरवन फाटा दरम्यान कार, दुचाकींचा समोरासमोर अपघात झाला. यात दुचाकीवरील दोन्ही तरुणांचा जगीच मृत्यू झाल्याची घटना घडली. हा अपघात एवढा भीषण होता की दुचाकींचा अक्षरशः चुराडा झाला. या अपघातात कारमधील नागरिकही जखमी झाल्याचे समजते.

पुष्पा शर्माचे खुनी निघाले बांधकाम मजूर 

अपघातानंतर मयत तरुणांना महामार्ग रुग्णवाहिकेतून माजलगाव ग्रामीण रुग्णालयात आणले. दोन्ही मयत तरुणांचे शवविच्छेदन सकाळी करण्यात येणार असून घटनेची माहिती मिळताच मयताच्या नातेवाईकांनी रुग्णालयात गर्दी झाली होती.

नांदेडात भरणार शंकर दरबार

loading image