कोरोना - अंबाजोगाईत रक्तदानासाठी युवक धावले

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

अंबाजोगाई (जि. बीड) - आगामी काळात रक्ताची गरज निर्माण झाल्यास रक्तसाठा कमी पडू नये, या उद्देशाने येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयातील रक्तपेढी, भारतीय जैन संघटनेच्या पुढाकाराने रक्तदान शिबिर घेण्यात आले. शनिवारी (ता. २८) व रविवारी (ता. २९) एकूण ५१ जणांनी रक्तदान केले. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्णांना रक्ताचा तुटवडा भासू नये म्हणून भारतीय जैन संघटनेने राज्यात विविध गावांत रक्तदान शिबिरे सुरू केली आहेत. शनिवारी (ता. २८) रक्तदान शिबिराचे उद्‍घाटन भारतीय जैन संघटनेचे विभागीय अध्यक्ष धनराज सोळंकी यांच्या रक्तदानाने झाले. यावेळी भवानी शर्मा, दत्ता कल्याणी, साहिल मुथा, श्रेणिक कात्रेला, प्रशांत शिंदे, गोविंद चोपडे, सचिन भातलवंडे, अमृत महाजन, शरद सुरवसे, विकास तट, कृष्णा तट, अजित तट, अमोल तट, विजय तट, प्रवीण गंगणे, अभिप्राय मस्के, आनंद कर्नावट, संतोष भंडारी, कल्पना भंडारी, सचिन कर्नावट, विनय पाथरकर, लाला शर्मा, राजेश दरक, पराग तांबोळी, निखिल वांजरखेडकर यांनी रक्तदान केले.

रक्तसंक्रमण अधिकारी विनय नालपे, सुजित तुम्मोड, डॉ. रमा साठवणे, डॉ. दत्ता चिकटकर, तंत्रज्ञ शशिकांत पारखे, सय्यद मुश्ताक, बाबा शेख, श्रीराम कुंजरवाड, अमोल उदावंत, रामदासी यांनी सहकार्य केले. रविवारी रक्तदान शिबिरात अपर पोलिस अधीक्षक स्वाती भोर यांनी रक्तदान केले. पोलिस कर्मचारी देवानंद देवकते, गोपाळ सूर्यवंशी, पुष्पा थोरात, राणी बनसोडे, गणेश तांदळे, महादेव आवळे, किसन गुळवे, मारुती कांबळे, गोविंद येलमटे, सुचिता शिंगाडे, तेजस वाहुळे, कल्याण देशमाने, तानाजी तांगडे, बाबूराव सोंडगे या पोलिस कर्मचाऱ्यांनी रक्तदान करून संचारबंदीत कामासोबतच सामाजिक सद्‍भाव जोपासला. 

दरम्यान, हे रक्तदान शिबिर संपूर्ण आठवडाभर चालणार आहे. रक्तदान शिबिरासाठी अडसर येऊ नये म्हणून शहर ठाण्याचे पोलिस निरीक्षक सिद्धार्थ गाडे यांनी रक्तदात्यांसाठी भारतीय जैन संघटनेच्या माध्यमतून सुरक्षा पास उपलब्ध करून दिले. ज्या रक्तदात्यांना रक्तदान करावयाचे आहे, त्यांनी जैन संघटनेचे स्थानिक अध्यक्ष नीलेश मुथा यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com