esakal | लातुरात भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या तरुणाचा खून, मित्राचे प्रेमप्रकरण बेतले जीवावर
sakal

बोलून बातमी शोधा

1crime_33

मित्राच्या प्रेमप्रकरणातून सुरु असलेले भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या तरुणाचा खून झाल्याची घटना रविवारी (ता.२५) रात्री लातूर येथे घडली.

लातुरात भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या तरुणाचा खून, मित्राचे प्रेमप्रकरण बेतले जीवावर

sakal_logo
By
हरी तुगावकर

लातूर : मित्राच्या प्रेमप्रकरणातून सुरु असलेले भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या तरुणाचा खून झाल्याची घटना रविवारी (ता.२५) रात्री येथे घडली. या प्रकरणी दोघांच्या विरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. येथील अशोक कापसे (वय २५) व मोहित बावणे हे दोघे रविवारी (ता. २५) रात्री साडेअकराच्या सुमारास विक्रमनगर भागात राहणाऱ्या अजय पिसाळ यास भेटण्यासाठी त्याच्या घरी गेले होते.

जालना जिल्हा सहकारी बँकेची शाखा फोडली, सहा दरोडेखोर अटकेत

तेथे मोहित बावणे व अजय पिसाळ यांच्यात मुलीच्या प्रेम प्रकरणातून झालेल्या जुन्या भांडणाच्या कारणावरून झटापट होऊ लागली. यात अशोक कापसे हा भांडण सोडवत असताना तेथे विजय पिसाळ हा हातात चाकू घेऊन आला. त्याने त्याच्या हातातील चाकून अशोक कापसे व मोहित बावणे या दोघांवर चाकूने वार केले. अशोक कापसे या तरुणाच्या गळ्यावर वार झाल्याने त्यातच त्याचा मृत्यू झाला. तसेच मोहित बावणे याच्या पाठीत, मांडीवर चाकूने मारहाण केली गेल्याने तो जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. या प्रकरणी विजय दिनकर पिसाळ व अजय दिनकर पिसाळ या दोघांच्या विरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

संपादन - गणेश पिटेकर