युवराज पन्हाळे खूनप्रकरण ; लातूर न्यायालयाकडून दोघांना जन्मठेप

Yuvraj Panhale murder case Latur court gave life imprisonment to both
Yuvraj Panhale murder case Latur court gave life imprisonment to both

लातूर : येथील पुष्कराज ट्रॅव्हल्सचे प्रमुख युवराज पन्हाळे
यांच्या खूनप्रकरणात त्यांच्या पुतण्यासह दोघांना येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश वृशाली जोशी यांनी शुक्रवारी (ता. २७) जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. या प्रकरणातील पाच जणांची मात्र पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

येथील पुष्कराज ट्रॅव्हल्सचे प्रमुख य़ुवराज पन्हाळे यांचा येथील
पशूपथीनाथनगर येथे चार डिसेंबर 2012 रोजी खून झाला होता. याप्रकरणी पन्हाळे यांचे बंधू व्यंकट पन्हाळे, त्यांचा मुलगा संतोष पन्हाळे, छाया पन्हाळे, कमलाकर बस्तापुरे, व्यंकट कुटवाड, गणेश सगर, मधुकर बस्तापुरे, गोविंद कुतवाड यांच्यावर येथील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. हे प्रकरण प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश वृशाली जोशी यांच्यासमोर चालले.

पन्हाळे कुटुंबियाचा पुष्कराज ट्रॅव्हल्सचा व्यवसाय होता. त्यात
शहरातील सीटीबसचे कामही त्यांना मिळाले होते. सीटी बसचा व्यवसाय आपला मुलगा संतोष पन्हाळे यांच्या नावाने करावा या करीता व्यंकट पन्हाळे व युवराज पन्हाळे यांच्यात वाद होते. या वादातून ही घटना घडली होती. 4 डिसेंबर २०१२ रोजी संतोष पन्हाळे व मधुकर बस्तापुरे या दोघांनी युवराज पन्हाळे यांच्या घराजवळ जावून त्यांना शिविगाळ व दमदाटी करण्यास
सुरवात केली. यावेळी युवराज पन्हाळे यांनी या घटनेतील प्रत्यक्ष साक्षीदार आपली पत्नी रुपाली पन्हाळे व सासू मीराबाई भागवत यांना दरवाजा बंद करण्यास सांगितले. त्यानंतर प्रकरण वाढत गेले. जीव वाचवण्यासाठी युवराज पन्हाळे पशूपतीनाथनगरकडे पळत गेले. तेथे पांडुरंग शिंदे यांच्या घरासमोर संतोष पन्हाळे व मधुकर बस्तापुरे यांनी युवराज पन्हाळे यांच्या डोक्यात पाईपने वार केले. या हल्ल्यातच त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणात आठ जणांवर गुन्हा दाखल झाला होता.  यात छाया पन्हाळे यांना उच्च न्यायालयाने
यापूर्वीच निर्दोष सुटका केली आहे. इतर सात जणाच्या विरोधात न्यायाधीश वृशाली जोशी यांच्यासमोर खटला चालला. या प्रकरणात पोलिसांनी संतोष पन्हाळे याची मोटार सायकल, रक्ताचे डाग असलेले कपडे जप्त केले होते. या प्रकरणात १८ साक्षी नोंदविण्यात आल्या.

परिस्थितीजन्य पुरावा पाहण्यात आला. मोटार सायकलवर बनावट नंबर होता. पण आरटीओकडून चासी व इंजिनवरील नंबर पाहून ती मोटार सायकल ही संतोष पन्हाळेचीच असल्याचे समोर आले होते. याप्रकरणात रुपाली पन्हाळे यांची
साक्षही महत्वाची ठरली. यातून संतोष पन्हाळे व मधुकर बस्तापुरे या दोघांना प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश जोशी यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.

या सरकारी पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील आर. आर. पाटील आरणीकर (सोलापूर) यांनी काम पाहिले. त्यांना अॅड. दीपक कुलकर्णी व अॅड. के. आर. सोनवणे यांनी सहकार्य केले. या प्रकरणात अॅड. पाटील यांनी उत्तमरीतीने खटला हाताळला. चांगल्या पद्धतीने साक्षी नोंदवित युक्तीवाद केल्याने दोघांना जन्मठेप होवू शकली, अशी माहिती जिल्हा सरकारी वकिल
संतोष देशपांडे यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com