
महिला महाराष्ट्र प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत रंगतदार सामने होत आहेत. शुक्रवारी (६ जून) रत्नागिरी जेट्स आणि सोलापूर स्मॅशर्स संघात पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर रोमांचक सामना झाला.
या सामन्यात कर्णधार तेजल हसबनीसच्या फलंदाजीच्या जोरावर सोलापूरने स्मृती मानधनाच्या रत्नागिरीचा ८ विकेट्सने पराभव केला. या सामन्यात सोलापूर स्मॅशर्सच्या शरयू कुलकर्णीने केलेलं सेलिब्रेशन मात्र चर्चेचा विषय ठरला. यासोबतच मानधनानेही तिच्या खिलाडूवृत्तीनं मनं जिंकली.