आदेश अन् मराठा

आदेश अन् मराठा

आदेश अन् मराठा 

आज मराठीतील दोन महान साहित्यिक आचार्य अत्रे अन् पु भा भावे यांची अनुक्रमे जयंती नि मयंती आहे. 

अत्रे १८९८ चे तर भावे १९१० चे !  अत्रे ७१ तर भावे ७० वर्ष जगले. अत्र्यांचा मधला कालखंड सोडला तर दोघेही सावरकरांवर प्रेम करणारे होते. दोघांनीही रोखठोक लिखाण केले. दोघेही पत्रकार होते. दोघेही मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विराजमान झालेले होते. दोघेही मराठीतील उच्च कोटीचे साहित्यकार होते. सावरकरांनी दोघांविषयी ही गौरवोद्गार काढलेले आहेत. 

सावरकरांवर लिहिताना अत्र्यांनी 'गांधींना हुतात्मा तर सावरकरांना महात्मा म्हटले.' अन् भाव्यानी सावरकरांना प्रेषित, राष्ट्र पुरुष म्हटले.

असे सारे असताना मधल्या कालखंडात दोघेही परस्परांशी हमरी तुमरीने, येथेच्छ भांडले कारण अर्थात च सावरकर ! 

सावरकर भाव्यांचे दैवत होते त्यावर अत्र्यांनी अशलाघ्य आरोप केले होते ते भाव्याना तिळमात्र पटले नाहीत. ते अत्र्यांवर त्वेषाने तुटून पडले. अत्रे कुत्सित अन् शिवराळ भाषेत गरळ ओकत होते तर भावे अत्र्यांच्या करंटेपणा चा तितक्यात तिखट भाषेत, शिव्याना शिणगार करत समाचार घेत होते. भावे भारदस्त ठरले; भावे जिंकले...

 भारत विभाजनाने, चिनी आक्रमणाने, कांग्रेसी टुकार राजकारणाने अत्र्यांचे डोळे उघडले अत्रे सावरकरांना मानू लागले होते, सावरकरांनी मागले सर्व विसरून अत्र्यांना जवळ घेतले होते. वाद मिटला होता...

मृत्यूच्या दारात असताना अत्र्यांनी भाव्यांकडे दोस्तीचा हात पुढे केला.  तरीही भाव्यानी दोस्तीचा हात साफ झिडकारला. ' अत्रे म्हणजे घाण होती ' हा त्यांचा त्यावरचा मनस्वी अभिप्राय होता. 

अत्र्यांची सावरकर स्तुती ही ठोकर बसलेल्या शहाण्याची क्षणाची उपरती होती तर भाव्यांची सावरकर निष्ठा जन्मजात होती. अत्रे सावरकरांना अनेक राष्ट्र पुरुष तील एक मानत होते तर भावे एकमेवाद्वितीय मानत होते.  अत्र्यांचे सावरकर प्रेम प्रासंगिक होते तर भाव्यांची सावरकर निष्ठा बावनकशी होती, अविचल होती. 

आज सावरकरांवर स्तुती सुमने उधळणारी अत्र्यांची ती उत्तुंग नि उत्कट लेखणी सावरकर प्रेमींना उत्साहक अन्  द्वेश्ट्याना संहारक वाटते  तर जन्मभर सावरकर निष्ठेत आकंठ बुडालेली भाषा प्रभू भाव्यांची लेखणी त्यांच्या सह साऱ्या सावरकर अन् हिंदुत्ववाद्यांना ललाम भूत वाटते.

सावरकर या एकाच तंतूशी विरुध्द अंगाने जोडलेल्या या दोन्ही साहित्यिकांना सादर प्रणाम....
              
- डॉ नीरज देव
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com