मुलाच्या वशिल्याने...

सुनील खाडिलकर
Monday, 16 December 2019

भावे स्कूलमध्ये दंगा खूप केला आणि अभ्यास करून पहिल्या पाचातही राहिलो. याच शाळेत माझ्या ‘वशिल्या’ने वडिलांना नोकरी मिळाली.

भावे स्कूलमध्ये दंगा खूप केला आणि अभ्यास करून पहिल्या पाचातही राहिलो. याच शाळेत माझ्या ‘वशिल्या’ने वडिलांना नोकरी मिळाली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शाळेत अभ्यासाची विशेष काळजी नसायची. कारण सरांनी शिकविलेले सर्व कळायचे, त्यामुळे वर्गात बाकीच्या वेळेत बडबड आणि दंगा याकडे जास्तच लक्ष होते. आम्ही सहावी- सातवीत असताना श्री. वि. कुलकर्णी सर नुकतेच आले होते. कोणी दंगा केला, की ते त्याला ‘माझी जन्मठेप’मधील ‘मला कोलूच्या घाण्याला जुंपले जाते’ हा सात-आठ पानी धडा लिहायला लावायचे. हा धडा बऱ्याच वेळा लिहून माझे हस्ताक्षर सुधारले. एकदा तर मी हा धडा ‘अँटिसिपॅटोरी बेल’प्रमाणे आधीच लिहून ठेवला होता.

बाळासाठी खराखुरा कोमल स्पर्श हवाय? तर मग...

मला शिक्षा मिळाली तेव्हा सरांनी सांगितले, की आजच्या आज धडा लिहिलास तरच उद्या वर्गात घेईन. दुसऱ्या दिवशी लिहिलेला धडा बघून आश्चर्यचकित झालेला त्यांचा चेहरा पाहताना मी मनातल्या मनात खुद्कन हसलो. वर्गात दंगा केल्यामुळे वर्गात बाकावर, वर्गाबाहेर अंगठे धरून उभे राहण्याची वेळ माझ्यावर बऱ्याच वेळा आली; पण हे घरी माहीत नव्हते. मात्र, एकदा झाली गम्मत! माझे वडील नोकरी करून सायंशाळेत बी.ए.चा अभ्यास करीत होते. त्यांचे ‘स्वाध्याय’चे सर होते आमचेच हिंदीचे कुलकर्णी सर. सरांच्या वर्गात दंगा केल्यावर त्यांनी माझ्या वडिलांना सांगितले. त्यामुळे शाळेत पिटाई झाल्यावर घरीही झाली. 

Video : घोटाळे असतील तर कामे थांबवायची नाही का? : मुख्यमंत्री

थोडाफार दंगेखोर असलो तरी पहिल्या पाचात असल्याने शिक्षक जरा काणाडोळा करायचे. त्यावेळच्या मॅट्रिकमध्ये (अकरावीत) मला ‘नॅशनल मेरिट स्कॉलरशिप’ व गणितात दोनशेपैकी दोनशे गुण मिळाले. मी कॉलेजला जाऊ लागलो. तोपर्यंत माझ्या वडिलांचे बीए झाले व त्यांनी नोकरी शोधायला सुरवात केली. भावे स्कूलला इंग्रजीसाठी शिक्षक हवा होता. मुलाखतीमध्ये बाकी सर्व गोष्टी झाल्या; पण शिकविण्याचा अनुभव नाही म्हणून त्यांना विचारले, की ‘तुमचा काही ‘रेफरन्स’ आहे का?’ माझे वडील म्हणाले, ‘‘जरा वेगळा आहे, माझा मुलगा सुनील तुमच्याच शाळेतून नुकताच पास झाला.’’ ते ऐकताच आठल्ये सर म्हणाले, ‘‘अहो, सुनीलचे वडील म्हणजे तुम्ही चांगलंच शिकवत असणार.’’ ...आणि माझ्या वडिलांना मिळाली शाळेत नोकरी!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Muktpeeth article