आतापर्यंत 1520 पोलिसांचा सिडकोच्या घरांना प्रतिसाद

शरद वागदरे
Wednesday, 12 August 2020

सिडकोने विशेष पोलिसांसाठी सुरू केलेल्या गृहयोजनेला पोलिसांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. एकूण 4466 गृहप्रकल्पासाठी मागील 15 दिवसांत 1520 पोलिसांनी सिडकोच्या वेबपोर्टलवर नोंदणी केली आहे. 

वाशी : सिडकोने विशेष पोलिसांसाठी सुरू केलेल्या गृहयोजनेला पोलिसांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. एकूण 4466 गृहप्रकल्पासाठी मागील 15 दिवसांत 1520 पोलिसांनी सिडकोच्या वेबपोर्टलवर नोंदणी केली आहे. 

मुंबई प्रादेशिक क्षेत्रात काम करणाऱ्या पोलिसांसाठी सिडकोने 27 जुलै रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या विशेष गृहयोजनेचा शुभारंभ केला आहे. यात 4466 घरांचा समावेश आहे. 28 जुलैपासून प्रत्यक्ष नोंदणीला सुरुवात झाली असून, 29 ऑगस्टपर्यंत घरांच्या नोंदणीसाठी पोर्टल खुले राहणार आहे. त्यानंतर 15 सप्टेंबर रोजी या योजनेची संगणकीय सोडत काढली जाणार आहे. सध्या 15 दिवसांत या पोर्टलला 3 हजार 150 पोलिसांनी भेट दिली. त्यापैकी मंगळवार सायंकाळपर्यंत 1520 पोलिसांनी नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केली. अर्ज सादर करण्यासाठी आणखी 15 दिवसांचा कालावधी शिल्लक असून, या कालावधीत आणखी अर्ज प्राप्त होतील, असा विश्वास सिडकोच्या संबंधित विभागाने व्यक्त केला आहे. 

सावधान! महिलांनो, साडी पडेल लाखात भारी

या गृहप्रकल्पात 1057 सदनिका आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी, तर उर्वरित 3409 सदनिका अल्प उत्पन्न गटासाठी असणार आहेत. पोलिस कर्मचाऱ्यांना विविध कारणांमुळे गृहस्वप्नाची पूर्तता करता येत नाही; परंतु सिडकोने त्यांना ही संधी उपलब्ध केली आहे. तळोजा, खारघर, कळंबोली, घणसोली, द्रोणागिरी येथे महागृहप्रकल्पाचे काम प्रगतिपथावर आहे. 

पर्यटकांना खूशखबर : माथेरानसाठी हा रस्ता ठरणार वरदान

मागील यशस्वी अर्जदारांना जानेवारीत प्रत्यक्ष वाटप 
मागणी तसा पुरवठा या तत्त्वावर घरांची निर्मिती करण्याच्या निर्णयानुसार सिडकोने विविध घटकांसाठी 2 लाख 10 हजार घरे बांधण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यातील 90 हजार घरांचे कामही सुरू करण्यात आले आहे. तत्पूर्वी 2018 मध्ये सिडकोच्या माध्यमातून काढण्यात आलेल्या 15 हजार घरांच्या गृहप्रकल्पातील यशस्वी अर्जदारांना येणाऱ्या जानेवारीमध्ये प्रत्यक्ष वाटप करण्याची तयारी सिडकोने सुरू केली आहे. 

(संपादन : उमा शिंदे)

 

महत्त्वाची बातमी : नवी मुंबईतील खासगी रुग्णांच्या लुटमारीला महापालिकेचा चाप


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 1520 State Police has registered name for Cidco's housing Scheme