रो-रो फेरीबोटीचा आनंद सुरूच राहणार, प्रवाशांचा वाढताेय प्रतिसाद

महेंद्र दुसार
Monday, 31 August 2020

गणेशोत्सवानिमित्ताने प्राथमिक स्वरूपात सुरू झालेली भाऊचा धक्का ते मांडवा ही रो-रो सेवा आता पुढेही सुरुच राहणार आहे. प्रवाशांचा वाढता प्रतिसाद पाहून ती नियमित सुरू राहणार असल्याची माहिती एम2एम फेरीबोट सर्व्हिसेसच्या वतीने सांगण्यात आले आहे. 

अलिबाग : गणेशोत्सवानिमित्ताने प्राथमिक स्वरूपात सुरू झालेली भाऊचा धक्का ते मांडवा ही रो-रो सेवा आता पुढेही सुरुच राहणार आहे. प्रवाशांचा वाढता प्रतिसाद पाहून ती नियमित सुरू राहणार असल्याची माहिती एम2एम फेरीबोट सर्व्हिसेसच्या वतीने सांगण्यात आले आहे. 

वाहतुकीची इतर साधने सुरू होत असल्याने भाऊचा धक्का ते मांडवा ही रो-रो सेवा सुरू ठेवण्यास राज्य सरकारने अनुमती दर्शवली आहे. गौरी-गणपती निमित्ताने अलिबाग, मुरूडमधील प्रवाशांना सोईचे व्हावे, यासाठी ही सेवा सुरू करावी, अशी मागणी प्रवाशांनी केली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी 20 ऑगस्टपासून 31 ऑगस्टपर्यंत सेवा सुरू करण्यास परवानगी दिली. 

अधिक वाचा : कोरोना नव्हे; चक्क या कारणामुळे खालापूर तालुक्यातील गाव क्वारंटाईन

20 ऑगस्टपासून सुरू झालेल्या या सेवेचा गणेशोत्सव दरम्यान 12 हजार प्रवाशांनी लाभ घेतला. प्राथमिक स्वरूपात सुरू झालेल्या या सेवेची दिवसाला एकच फेरी पूर्ण होत होती. सकाळी भाऊचा धक्का येथून प्रवासी घेऊन ही फेरीबोट साधारण एका तासात मांडवा येथे पोहचते. मांडवा येथून सायंकाळी तिचा परतीचा प्रवास सुरू होतो. भरती-ओहोटीनुसार वेळापत्रकात थोडाफार बदल करण्यात आला आहे. परंतु, मुसळधार पावसातही ही सेवा सुरू असल्याने रोरोला प्रवाशांचा प्रतिसाद वाढत चालला आहे. याचमुळे मेरीटाईम बोर्ड आणि एम2एम फेरीबोट सर्व्हिसेसने ही सेवा नियमित सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई

महत्त्वाची बातमी : पोस्ट कोव्हिड रुग्णांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष, उपनगरांतील बरे झालेले रुग्ण वार्!यावर

प्रतिसाद समाधानकारक आहे. भविष्यात तो आणखी वाढण्याची आशा आहे. सध्याच्या वेळापत्रकात बदल होणार नसून ही सेवा पुढेही अशीच राहणार आहे. 
-हाशिम मोंगीया, संचालक, एम2एम 

(संपादन : उमा शिंदे)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bhaucha Dhakka to Mandava Ro-ro Ferryboat service will continue running at same time