पनवेल हद्दीत एका महिन्‍यात 7490 रुग्णांची वाढ; तर 144 जणांचा मृत्यू

गजानन चव्हाण
Friday, 2 October 2020

पनवेल महानगरपालिका हद्दीत सप्टेंबर महिन्यात 7490 व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे. तर 144 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. पालिका परिसरात गेल्या 30 दिवसांत सरासरी पाच व्यक्तींचा मृत्यू होत असल्याचे पालिकेच्या अहवालावरून स्पष्ट होत आहे. 

खारघर : पनवेल महानगरपालिका हद्दीत सप्टेंबर महिन्यात 7490 व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे. तर 144 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. पालिका परिसरात गेल्या 30 दिवसांत सरासरी पाच व्यक्तींचा मृत्यू होत असल्याचे पालिकेच्या अहवालावरून स्पष्ट होत आहे. 

पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाची रुग्णसंख्या कमी होण्याऐवजी वाढ होताना दिसत आहे. पालिकेकडून प्रसारित होणाऱ्या अहवालानुसार 1 सप्टेंबरपर्यंत पालिका हद्दीत 12001 व्यक्तींना लागण झाली होती. तर 288 व्यक्ती कोरोनामुळे दगावले आहे. 1 ऑक्‍टोबर पालिकेने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार रुग्णसंख्या 19,491 इतकी असून, त्यात 432 व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. म्हणजेच गेल्या 30 दिवसांत पालिका हद्दीत 7490 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 144 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. गेल्या 30 दिवसांत सरासरी 4.8 व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे अहवालावरून स्पष्ट होत आहे. 

हेही वाचा : नवी मुंबईत ३१ ऑक्टोबरपर्यंत लॉकडाऊन जाहीर; पुन्हा कठोर नियम, आयुक्तांचे आदेश

पनवेल पालिका हद्दीत दिवसागणिक जवळपास 250 जणांना बाधा होत आहे. घराबाहेर पडताना व्यक्तीने तसेच दुकानदार, भाजी, मटण, चिकन, फळविक्रेत्यांनी मास्क वापरावे, असे स्पष्ट आदेश आहेत; परंतु त्याकडे दुर्लक्ष होते. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिकेने योग्य प्रकारे उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. 

आणखी वाचा : पनवेलमधील ६२ वर्षीय महिलेने ४ रुग्णांना दिले जीवदान

सात महिन्यांत 19,491 रुग्ण 
गेल्या सात महिन्यांत 19,491 व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यात 1 ते 10 वयोगटातील जवळपास 980 मुलांना लागण झाली आहे. 

अधिक वाचा : ठाण्यातील आर्केडिया मॉलमध्ये भीषण आग; सहा दुकाने भस्मसात

काय सांगते महिनाभराची आकडेवारी 

             1 सप्टेंबरपर्यंत     1 ऑक्‍टोबर     एकूण वाढ 
लागण          12001         19,491         7490 
मृत्यू                 288              432          144  

 

(संपादन : उमा शिंदे)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Patients ratio has increased in month of September