अलिबाग वस्तुसंग्रहालय पुन्हा कागदावरच; 17 एकर जागेचा शोध सुरू

महेंद्र दुसार
Monday, 19 October 2020

अलिबाग : अलिबाग येथे कायमस्वरूपी इतिहासकालीन वस्तूंचे संग्रहालय असावे, ही मागणी 20 वर्षांपासून चर्चेत आहे. यापूर्वी अलिबाग नगरपालिकेच्या जुन्या नगरपालिका इमारतीमध्ये वस्तूसंग्रहालय उभारावे, अशी मागणी होती. त्यानंतर हिराकोट तलाव आणि आता 17 एकरमध्ये प्रशस्त महाराष्ट्राचा वस्तूसंग्रहालय उभारण्यात यावा, असा प्रस्ताव तयार केला आहे. यासाठी योग्य जागेचा शोध सुरू आहे. मात्र, यापूर्वीचे प्रस्ताव योग्य जागा आणि निधी न मिळाल्याने कागदावरच राहिले. 

अलिबाग : अलिबाग येथे कायमस्वरूपी इतिहासकालीन वस्तूंचे संग्रहालय असावे, ही मागणी 20 वर्षांपासून चर्चेत आहे. यापूर्वी अलिबाग नगरपालिकेच्या जुन्या नगरपालिका इमारतीमध्ये वस्तूसंग्रहालय उभारावे, अशी मागणी होती. त्यानंतर हिराकोट तलाव आणि आता 17 एकरमध्ये प्रशस्त महाराष्ट्राचा वस्तूसंग्रहालय उभारण्यात यावा, असा प्रस्ताव तयार केला आहे. यासाठी योग्य जागेचा शोध सुरू आहे. मात्र, यापूर्वीचे प्रस्ताव योग्य जागा आणि निधी न मिळाल्याने कागदावरच राहिले. 

अलिबागमध्ये येणाऱ्या पर्यटकांना येथील इतिहासाची माहिती व्हावी, यासाठी कायमस्वरूपी वस्तूसंग्रहालय उभारण्यात यावे, ही मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. मध्यंतरी कान्होजी आंग्रे समाधीस्थळ परिसरात लहानसे वस्तूसंग्रहालय उभारणार असल्याची चर्चा होती; परंतु या सर्व चर्चाच राहिल्या आहेत. वस्तूसंग्रहालय उभारण्यासाठी योग्य जागा आणि निधीची कमतरता असल्याने त्यावर पुढील कारवाई झालेली नाही. अलिबागमधील जमिनीच्या वाढलेल्या किमती आणि शासकीय जागेचा अभाव हा देखील यामागील मुख्य कारण असल्याचे दिसून येत आहे. 

आणखी वाचा : नवरात्रोत्सवात खरेदीकडे ग्राहकांची पाठ; बाजारपेठेवर मंदीचे सावट

छत्रपती शिवाजी महाराजांचा समृद्ध इतिहास येथे ठिकठिकाणी दडलेला आहे. त्याचबरोबर इंग्रज, डच, पौर्तुगीज, जंजिऱ्याचा नबाब यांच्यासह बौद्धकालीन लेण्या अशा काही ऐतिहासिक वस्तू धूळ खात पडलेल्या आहेत. येथील इतिहासाची साक्ष असलेल्या वस्तू काही इतिहासप्रेमींच्या संग्रही आहेत. उत्खननात सापडलेल्या वस्तू, शिलालेख, पुरातण नाणी या संग्रहालयात मांडता येणार आहेत. यासाठी 20 वर्षांपासून अलिबागमध्ये वस्तूसंग्रहालय उभारावे, अशी मागणी केली जात आहे. त्याला अनेक पर्यायही आले; परंतु योग्य जागा आणि निधीच्या कमतरतेमुळे सर्व प्रस्ताव केवळ कागदावरच राहिले. 

अधिक वाचा : मुरूड तालुका कोरोनामुक्तीच्या मार्गावर! केवळ सहा रुग्ण पाॅझिटिव्ह

सध्या पालकमंत्री अदिती तटकरे यांनी राज्याचे वस्तूसंग्रहालय अलिबागमध्ये बांधण्याची मागणी राज्य सरकारकडे केली आहे. अलिबाग हे वस्तूसंग्रहालयासाठी उपयुक्त ठिकाण असल्याचे त्यांनी राज्याच्या सांस्कृतिक आणि पर्यटन विभागाला पटवून देण्याचा प्रयत्न केला. हा प्रस्ताव योग्य जागा निवडीचा शोध मोहिमेवर थांबला आहे. 

हेही वाचा : सर्व महिलांना लोकल प्रवासास अजूनही परवानगी का नाही? समोर आलं खरं कारण

यापूर्वीच्या प्रस्तावांबाबत जिल्हा प्रशासनाकडे नोंद नाही. लोकप्रतिनिधींनी ती मागणी केली असावी किंवा त्यांनी सूचवलेले असावे. नव्याने स्टेट म्युझियमसाठी जागा शोधण्याचे काम सुरू आहे. अद्याप कोणतीही जागा निवडलेली नाही किंवा सूचवण्यात आलेली नाही. 
- निधी चौधरी, जिल्हाधिकारी, रायगड 

वस्तूसंग्रहालय ऐतिहासिक इमारतीमध्ये करण्यात यावेत, अशी मागणी करताना अलिबाग येथील हिराकोट किल्ल्याची जागा सूचवण्यात आली होती. ज्या ठिकाणी कारागृह आहे. आंग्रे यांच्या इतिहासाची साक्ष असलेल्या इमारतीमध्ये कारागृह नसावे, असे म्हणणे येथील इतिहासप्रेमींचे आहे. त्यानुसार ही मागणी केली होती. 
- महेंद्र दळवी, आमदार, अलिबाग-मुरूड 

 

(संपादन : उमा शिंदे)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Museum Proposal still pending in Raigad