नवी मुंबईकरांसाठी खूशखबर; आयुक्तांनी दिली परवानगी... व्यावसायिकांची चिंता मिटली

सुजित गायकवाड
Monday, 17 August 2020

अनलॉक काळात कन्टेमेंट झोन वगळता इतर भागांतील दुकाने नियमित सुरू ठेवण्यास महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी परवानगी दिली आहे. सर्वच दुकाने सरसकट सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी बेलापूरच्या भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी महापालिकेकडे केली होती. बांगर यांनी परवानगी दिल्यामुळे म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.

नवी मुंबई : अनलॉक काळात कन्टेमेंट झोन वगळता इतर भागांतील दुकाने नियमित सुरू ठेवण्यास महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी परवानगी दिली आहे. सर्वच दुकाने सरसकट सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी बेलापूरच्या भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी महापालिकेकडे केली होती. बांगर यांनी परवानगी दिल्यामुळे म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. ऐन गणेशोत्सव काळात महापालिकेने मुभा दिल्यामुळे नवी मुंबईतील व्यावसायिकांनी म्हात्रे यांचे आभार मानले आहे. 

कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी महापालिकेमार्फत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. त्यामुळे दुकाने पूर्णपणे बंद होती. त्याचे उद्योजक व व्यापाऱ्यांना फार मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावे लागले. अनलॉक काळातही शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे दुकानांना सम विषम तारखेला सुरू ठेवण्याची परवानगी महापालिकेने दिली. दिवसाआड दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी असल्यामुळे व्यवसाय होत नसल्याची ओरड व्यापारी वर्गातून सुरू होती. 

गुन्हे बातमी : ज्वेलर्सनेच रचला १८ तोळे दागिने चोरीचा बनाव; वाचून तुम्हीही व्हाल थक्क ..!

व्यवसायाला तेजी येत नसल्यामुळे व्यापारी वर्ग आर्थिक विवंचनेत सापडले आहेत. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून महापालिका हद्दीतील छोट्या-मोठ्या उद्योगधंद्यांनाही दररोज व्यवहार करण्याची परवानगी मिळावी, अशी संपूर्ण नवी मुंबईतील व्यापाऱ्यांनी मागणी केली होती. व्यावसायिक व व्यापाऱ्यांची मागणी ही रास्त असल्याने व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळासह म्हात्रे यांनी बांगर यांची भेटही घेतली होती.

मोठी बातमी : मुंबईनजीकच्या बेटांवर आता थेट गाडीने जाता येणार; महापालिकेने घेतला पुढाकार

नियमित व्यवसाय करण्यास मुभा देण्याची; तसेच संपूर्ण वेळ दुकाने खुली ठेवण्याबाबतची लेखी मागणी भाजपतर्फे मंदा म्हात्रे यांनी केली होती. याबाबत बांगर यांनी सकारात्मक निर्णय घेतल्यामुळे व्यावसायिक वर्गात आनंदाचे वातावरण आहे. 

(संपादन : उमा शिंदे)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Now all shops will be open in Navi Mumbai