प्रकल्पग्रस्त कंत्राटदारांना रोजगार मिळवून देऊ; आमदार मंदा म्हात्रे

सुजित गायकवाड
Friday, 23 October 2020

उद्यान विभागातील स्थानिक कंत्राटदारांना महापालिकेने बाहेरची वाट दाखवल्यानंतर आता साफसफाईच्या कामातील 96 कंत्राटदारांचे काम हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत आहे. महापालिकेतील अशा अधिकाऱ्यांना आपण सोडणार नाही, स्थानिकांवर होणारा अन्याय कधीच सहन करणार नाही, तुम्हाला तुमचा रोजगार मिळेलच, अशा शब्दांत आमदार मंदा म्हात्रे यांनी कंत्राटदारांना आश्‍वासन दिले. तसेच, या कंत्राटदारांवर होत असलेल्या अन्यायाबाबत चर्चा करण्यासाठी सोमवारी (ता. 23) बैठक घेणार आहेत. 

नवी मुंबई : उद्यान विभागातील स्थानिक कंत्राटदारांना महापालिकेने बाहेरची वाट दाखवल्यानंतर आता साफसफाईच्या कामातील 96 कंत्राटदारांचे काम हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत आहे. महापालिकेतील अशा अधिकाऱ्यांना आपण सोडणार नाही, स्थानिकांवर होणारा अन्याय कधीच सहन करणार नाही, तुम्हाला तुमचा रोजगार मिळेलच, अशा शब्दांत आमदार मंदा म्हात्रे यांनी कंत्राटदारांना आश्‍वासन दिले. तसेच, या कंत्राटदारांवर होत असलेल्या अन्यायाबाबत चर्चा करण्यासाठी सोमवारी (ता. 23) बैठक घेणार आहेत. 

काही दिवसांपासून नवी मुंबई महापालिकेत काही ठराविक अधिकाऱ्यांकडून स्थानिक प्रकल्पग्रस्त कंत्राटदारांना डावलण्याचे काम सुरू आहे. उद्यान विभागातील स्थानिक कंत्राटदारांची कामे काढून घेतल्यानंतर या अधिकाऱ्यांनी आता स्वच्छतेच्या कंत्राटदारांविरोधात आपला मोर्चा वळवला आहे. महापालिकेतर्फे नवी मुंबई शहरात विविध नोडमध्ये गटारे, नाले आणि इतर स्वच्छतेसाठी 96 कंत्राटदार नेमले आहेत. या कंत्राटदारांऐवजी एकाच कंत्राटदाराला ठेका देण्याचा घाट घातला जात आहे. या संबंधात प्रश्‍न मांडण्यासाठी कंत्राटदारांनी मंदा म्हात्रे यांची भेट घेतली. या भेटीत कंत्राटदारांनी मंदा म्हात्रे यांच्याकडे आपल्या व्यथा मांडल्या. 

अधिक वाचा : ऊर्जा विभागात होणार महाभरती; महापारेषणमध्ये तांत्रिक आणि अभियांत्रिकी संवर्गातील पदे भरली जाणार

सिडकोने जमिनी संपादित करून नवी मुंबईतील शेतकऱ्यांना भूमिहीन केले. त्यात महापालिकेच्या कंत्राटांच्या माध्यमातून मिळणारे उत्पन्नही बंद झाले. त्यामुळे उपासमार ओढावण्याची भीती या कंत्राटदारांनी व्यक्ती केली. गेली 23 वर्षे ठेक्‍यांमधील स्वच्छतेच्या कामाचा दर न वाढवता कंत्राटदारांनी मिळेल ते काम नियमित केले आहे.

महत्त्वाची बातमी : मुंबईतल्या BKC कोव्हिड केंद्रातील रुग्णांच्या सेवेसाठी रोबो दाखल

कामात कोणताच खंड पडू न दिल्यामुळे महापालिकेला स्वच्छतेच्या बाबतीत राज्यात पहिला आणि देशात तिसरा क्रमांक पटकावता आला आहे. असे असतानाही काही निवडक लोकांच्या फायद्यासाठी आपण हा अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाही म्हात्रे यांनी कंत्राटदारांनी दिली. कंत्राटदारांच्या या समस्यांबाबत म्हात्रे यांनी आयुक्त अभिजित बांगर आणि अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांच्यासोबत फोनवरून संपर्क साधला. तसेच येत्या सोमवारी बांगर यांना भेटून सविस्तर चर्चा करणार असल्याचे सांगितले. 

 

संपादन : उमा शिंदे)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Provide employment to Project affected Contractor