झायराला नैराश्‍याने ग्रासले 

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 12 मे 2018

मुंबई - "दंगल फेम' अभिनेत्री झायरा वसीम हिला नैराश्‍याने ग्रासले आहे. तिने इन्स्टाग्रामवर या संदर्भात स्पष्टीकरण देताना सांगितले की, चार वर्षांपासून नैराश्‍याचा सामना करत आहे. 

आजवर ही बाब मान्य करत नव्हते. नैराश्‍याकडे आपल्या समाजात प्रचंड नकारात्मक दृष्टीने पाहिले जाते. त्यामुळे हे मान्य करण्याचीही भीती वाटत होती, असे झायराने लिहिले आहे. तू फारच तरुण आहेस किंवा हे दिवस जातील. हा आयुष्याचा एक टप्पा आहे, असे मला वारंवार सांगण्यात आले. त्यामुळे नैराश्‍याबाबत सांगण्याचे धाडस केले नाही, असे तिने सांगितले. 

दररोज पाच गोळ्या घेणे, रात्री-अपरात्री रुग्णालयात दाखल होणे, विचित्र भास होणे, एकटेपणा जाणवणे, आठवडा-आठवडा रात्री झोपच न लागणे, दिवसेंदिवस उपाशी राहणे हा सगळा त्रास चार वर्षांपासून सहन करते आहे. अनेकदा आयुष्य संपवण्याचा विचारही मनात आला; मात्र आता या आजाराचा खुलेपणाने स्वीकार करण्याचे ठरवले आहे. माझा दृष्टिकोन बदलणार असून त्याचा सामना करायचा असा निश्‍चय केला आहे. हे सगळे करण्यासाठी तुमच्या प्रार्थनेची आणि आशीर्वादाची आवश्‍यकता आहे, असेही तिने सांगितले.

Web Title: Actress Zaira Wasim in depression