"सारेगमप'फेम गायिका कार्तिकी गायकवाडचे डिसेंबरमध्ये शुभमंगल सावधान

संतोष भिंगार्डे
Wednesday, 21 October 2020

पुण्यातील एका रिसॉर्टवर जुलै महिन्यात झालेल्या या समारंभाला गायकवाड आणि पिसे कुटुंबीयांतील काही मंडळी उपस्थित होती; मात्र आता कार्तिकी आणि रोनित यांच्या लग्नाची तारीख निश्‍चित झाली आहे.

मुंबई ः आपल्या सुमधुर आवाजाने तमाम रसिकांना मोहिनी घालणाऱ्या "सारेगमप' लिटल चॅम्पफेम कार्तिकी गायकवाड आता लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. येत्या 9 डिसेंबरला बिझनेसमन असलेल्या रोनित पिसे याच्याशी ती लग्नगाठ बांधणार आहे. हा विवाह सोहळा पुण्यात काही मोजक्‍या मंडळींच्या उपस्थितीत पार पडणार आहे. 

महाराष्ट्रातही समूह संसर्गच, दिवाळीनंतर रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता

लॉकडाऊनच्या काळात कार्तिकीने आपला साखरपुडा केला होता. पुण्यातील एका रिसॉर्टवर जुलै महिन्यात झालेल्या या समारंभाला गायकवाड आणि पिसे कुटुंबीयांतील काही मंडळी उपस्थित होती; मात्र आता कार्तिकी आणि रोनित यांच्या लग्नाची तारीख निश्‍चित झाली आहे. दोन्ही घरच्या नातेवाईक मंडळींच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडणार आहे.

कार्तिकीचे वडील कल्याणजी गायकवाड छोटे-मोठे संगीताचे कार्यक्रम करीत असतात. त्या कार्यक्रमात पिसे कुटुंबीयांची व त्यांची ओळख झाली. पिसे कुटुंबीयालाही संगीताची आवड आहे. लॉकडाऊनच्या काळात गायकवाड आणि पिसे कुटुंबीय यांच्यात बोलणी झाली व साखरपुडा करण्यात आला; मात्र आता लग्नानंतर कार्तिकी गायन करणार की नाही हे समजलेले नाही.

(संपादन- बापू सावंत)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Karthiki Gaikwad getting married in December