राज कपूरच्या जन्मदिनी रशियन अभिनेत्रीची उपस्थिती

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 15 डिसेंबर 2016

मुंबई - दिवंगत ज्येष्ठ अभिनेते राज कपूर यांच्या 92 व्या जन्मदिनानिमित्त मुंबईत झालेल्या कार्यक्रमात "मेरा नाम जोकर' चित्रपटातील सहकलाकार रशियातील अभिनेत्री सेनिया रियाबिनकिना उपस्थित होत्या. या वेळी सेनिया यांनी "मेरा नाम जोकर' चित्रपटासह राज कपूर यांच्याविषयीच्या आठवणींना उजाळा दिला.

सेनिया म्हणाल्या की, आतापर्यंत मी जवळपास 15-16 चित्रपटांत काम केले; मात्र आजही मला सर्वांत जास्त "मेरा नाम जोकर' या चित्रपटातील भूमिकेमुळे ओळखले जाते. राज कपूर एक चांगली आणि दयाळू व्यक्ती होती. "मेरा नाम जोकर'मध्ये काम करण्याची संधी मला अचानक मिळाली. मारिनाच्या भूमिकेसाठी कलाकाराचा शोध रशियन सर्कसमध्ये सुरू होता. त्या वेळी मी अजिबात चर्चेत नव्हते. उलट, माझी बहीण एलेना ही लोकप्रिय कलाकार होती; तरीही राज यांनी मला भेटायला बोलावले आणि माझी निवड केली.

Web Title: rasian actress present at raj kapoor birth anniversary