esakal | ठाण्याच्या "स्टार' एकांकिकेने पटकावला जयंत करंडक; राज्यस्तरीय स्पर्धा
sakal

बोलून बातमी शोधा

Thane's 'Star' play wins Jayant Trophy; state level competition

"जयंत करंडक' राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत जिराफ थिएटर्स (ठाणे) या संघाच्या "स्टार' या एकांकिकेने प्रथम क्रमांकाचा जयंत करंडक पटकावला.

ठाण्याच्या "स्टार' एकांकिकेने पटकावला जयंत करंडक; राज्यस्तरीय स्पर्धा

sakal_logo
By
धर्मवीर पाटील

इस्लामपूर (जि. सांगली) ः अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची येथील शाखा व राजारामबापू ज्ञानप्रबोधिनीतर्फे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या "जयंत करंडक' राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत जिराफ थिएटर्स (ठाणे) या संघाच्या "स्टार' या एकांकिकेने प्रथम क्रमांकाचा जयंत करंडक पटकावला. परिवर्तन नाट्य संस्थेने (कोल्हापूर) सादर केलेल्या "जंगल जंगल बटा चला है' या एकांकिकेस द्वितीय; तर समांतर (सांगली) संस्थेच्या "समांतर' या एकांकिकेला तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. 

याशिवाय पहिलं प्रोडक्‍शन- अहमदनगर (पीसीओ), आमचे आम्ही- पुणे (लव्ह इन रिलेशनशिप) आणि गायन समाज देवल क्‍लब- कोल्हापूर (काय राव) यांच्या एकांकिकांना उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले. तसेच स्थानिक उत्कृष्ट एकांकिका म्हणून नागदेवता ग्रुपच्या "फुंकर'ला गौरवण्यात आले.

वैयक्‍तिक पारितोषिकांमध्ये- दिग्दर्शन- प्रथम : बॉबी (ठाणे), द्वितीय : किरणसिंह चव्हाण (कोल्हापूर), तृतीय : धनश्री गाडगीळ (सांगली); अभिनय- पुरुष- प्रथम : अनिल आव्हाड (ठाणे), द्वितीय : मयुरेश पाटील (सांगली), तृतीय- निहाल रोकडीकर (कोल्हापूर); अभिनय- स्त्री- प्रथम : धनश्री गाडगीळ (सांगली), द्वितीय : अक्षता ताले (ठाणे), तृतीय : मेघना होशिंग (सातारा), उत्तेजनार्थ : अस्मिता खटावकर (इस्लामपूर) यांनी बाजी मारली. 

राजारामबापू सहकारी बॅंकेचे अध्यक्ष प्रा. शामराव पाटील, कल्पना कुंभार, दया एकसंबेकर, शिवानी घाटगे, डॉ. विलास आफळे यांच्याहस्ते पारितोषिके देण्यात आली. अध्यक्षा वृषाली आफळे, रोझा किणीकर, प्रा. प्रकाश जाधव, रज्जाक मुल्ला, गायत्री खैर उपस्थित होते. विश्‍वास पांगारकर, श्रीनिवास एकसंबेकर, डॉ. सूरज चौगुले यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

नियामक मंडळ सदस्य व नाट्य परिषदेचे कार्यवाह डॉ. संदीप पाटील यांनी प्रास्ताविक केले. उपाध्यक्ष शशिकांत कुलकर्णी यांनी आभार मानले. आज्ञेय पाटील, राहुल पवार, अक्षय कुलकर्णी, दिलीप सुतार, डॉ. अतुल मोरे, राजाभाऊ कदम, मंगल देसावळे, रवी बावडेकर, डॉ. नीलम शहा, शुभम कर्णे, विनय महाडिक, योगिता माळी यांनी संयोजन केले. 

संपादन : युवराज यादव