बोर्लीच्या लोकनियुक्त सरपंच अविश्‍वास मंजूर होऊनही पदावर कायम ; तहसिलदारांचा वरिष्ठांना अहवाल

महेंद्र दुसार
Wednesday, 14 October 2020

मुरूड तालुक्‍यातील बोर्ली ग्रामपंचायत सरपंच नौशाद दळवी यांच्यावर उपसरपंच मतीन सौदागर यांच्यासाहित नऊ जणांनी टाकलेला अविश्‍वास ठराव मंजूर होऊनसुद्धा नौशाद दळवी यांचे सरपंचपद अबाधित राहिले आहे.

 

अलिबाग : मुरूड तालुक्‍यातील बोर्ली ग्रामपंचायत सरपंच नौशाद दळवी यांच्यावर उपसरपंच मतीन सौदागर यांच्यासाहित नऊ जणांनी टाकलेला अविश्‍वास ठराव मंजूर होऊनसुद्धा नौशाद दळवी यांचे सरपंचपद अबाधित राहिले आहे. 
सरपंच नौशाद दळवी यांच्याविरोधात अविश्‍वास ठराव हा 7 ऑक्‍टोबर रोजी सादर करण्यात आला होता. या संदर्भात तहसीलदार गमन गावित यांनी सोमवारी (ता. 12) सदस्यांची विशेष सभा बोलावली होती.

मंदिरे उघडण्याच्या मुद्यावरून अमृता फडणवीस यांचा मुख्यमंत्र्यांना टोला

तहसीलदार गमन गावित यांनी सांगितले आहे की, सभेत अविश्‍वास ठरावाच्या बाजूने उपसरपंचांसहित नऊ सदस्यांनी मतदान केल्याने सरपंच नौशाद दळवी यांच्या विरोधातला अविश्‍वास ठराव मंजूर करण्यात आला. मात्र, नौशाद दळवी हे थेट जनतेतून निवडून सरपंचपद झाले आहेत. त्यामुळे आम्हाला पद रिक्त करण्याचा अधिकार नाही. मी माझ्या अध्यक्षतेखाली निवडणूक घेतली आहे.

बीएमसी आयुक्त आणि महापौरांमध्ये खडाजंगी; आयुक्तांच्या माफीनंतर वादावर पडदा

या सभेबाबत अहवाल हा जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला आहे. जोपर्यंत वरिष्ठ कार्यालयाकडून निकाल येत नाही, तोपर्यंत सरपंच नौशाद दळवी यांचे सरपंच पद कायम राहणार आहे, असे सुद्धा गावित यांनी सांगितले. दरम्यान, विरोधकांनी केलेले सर्व आरोप नौशाद दळवी यांनी फेटाळले आहेत. 
 

 no confidence motion against barli  sarpanch

 

 

(संपादन ः रोशन मोरे)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title:  no confidence motion against barli  sarpanch