Accident News : लग्नावरून परतणाऱ्या वऱ्हाडावर काळाचा घाला; 1 जणांचा मृत्यू, 6 गंभीर जखमी

खोपोलीजवळ बोरघाटामध्ये कंटेनरने खाजगी बसला मागून धडक दिली त्यानंतर हा भीषण अपघात
Accident News
Accident NewsEsakal

लग्नावरून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाने घाला घातला आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात झाला आहे. हा भीषण अपघात खोपोली जवळ झाल्याची महिती समोर आली आहे. या भीषण अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. तर अपघात 6 प्रवासी गंभीर जखमी झालेत. जखमी झालेल्या व्यक्तींना नगरपालिका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. बसला कंटेनरने पाठीमागून धडक दिल्यामुळे हा अपघात झाला आहे. या अपघातामुळे एक्स्प्रेसवर वाहतुक कोंडी झाली आहे.

खोपोलीजवळ बोरघाटामध्ये कंटेनरने खाजगी बसला मागून धडक दिली त्यानंतर हा भीषण अपघात घडला. हा अपघात इतका भीषण होता की, बसची मागची बाजू पूर्ण फुटली आहे. कंटेनरचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. बसमध्ये एकूण 35 प्रवासी प्रवास करत होते. या अपघातात बसचा चालकाचा मृत्यू झाला आहे. तर जखमींवर उपचार सुरू आहेत.

Accident News
ST Accident : उरुळी देवाची मध्ये ब्रेक निकामी होऊन एसटी ला अपघात

मिळालेल्या माहितीनुसार, बस सिंधुदुर्गामध्ये लग्नासाठी गेली होती. कोल्हापूर मार्गे वाशिंदला परतताना बसला पाठीमागून कंटेनरने धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामुळे एक्स्प्रेसवरील वाहतूक विस्कळीत झाली. अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी संस्थेची यंत्रणा घटनास्थळी दाखल असून मदतकार्य सुरू आहे.

Accident News
Delhi Accident Video: धक्कादायक! भरधाव कारने 3 मुलांना चिरडलं, एकाची प्रकृती गंभीर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com