सात महिन्यांच्या गर्भवतीच्या अंडाशयातून काढला 10 किलोचा ट्यूमर

महिला आणि तिचे बाळ दोन्ही ही सुखरुप आहेत.
Surgery
Surgery

मुंबई: मुंबईतील जेजे रुग्णालयात (jj hospital) एका सात महिन्यांच्या गर्भवतीच्या अंडाशयातून 10 किलो वजनाचा ट्यूमर काढण्यात (Tumour removed) रुग्णालयातील स्त्रीरोगतज्ज्ञांना यश आले आहे. जवळपास 45 मिनिटे केलेल्या या शस्त्रक्रियेत (surgery) महिला आणि तिचे बाळ दोन्ही ही सुखरुप आहेत. आश्चर्य म्हणजे ही शस्त्रक्रिया करताना गर्भाशयातील बाळाला (baby) कोणताही त्रास झाला नसून त्याची प्रकृती ही उत्तम आहे. (10 kg tumour removed from seven month pregnanat womens body in jj hospital dmp82)

जेजे रुग्णालयातील स्त्रीरोगतज्ज्ञांच्या कौशल्याने ही शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली आहे. घाटकोपरच्या पाथा चिरागनगरमध्ये राहणारी 33 वर्षीय नीलम सोनी या 7 महिन्यांच्या गर्भवती आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्या त्रासात होत्या. महिलेच्या उजव्या अंडाशयात 20 बाय 24 सेमी आकाराचा मोठा ट्युमर असल्याचे डॉक्टरांना आढळले होते. त्यानुसार, राजमाथा रुग्णालयातून या महिलेला पुढील उपचारांसाठी जेजे रुग्णालयात पाठवले गेले.

Surgery
संजय राऊत यांच्याविरोधात याचिका, हायकोर्टाने निकाल ठेवला राखून

त्यानंतर ही महिला जेजे रुग्णालयात दाखल झाली. सर्व तपासण्या केल्यानंतर डॉक्टरांनी या महिलेची शस्त्रक्रिया करुन हा ट्यूमर काढण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, भूलतज्ज्ञ आणि इतर टीम सज्ज होऊन या महिलेच्या गर्भाशयातील ट्यूमर काढण्यात डॉक्टर्स यशस्वी झाले.

45 मिनिटांत यशस्वी शस्त्रक्रिया -

महिला गर्भवती असल्याने जास्त वेळ भूल देणे धोकादायक ठरु शकत होते. त्यामुळे, या शस्त्रक्रियेत भूल देणाऱ्या डॉक्टरांनी ही आपले कौशल्य पणाला लावले होते. गर्भाशयातील ट्यूमरच्या खालच्या बाजूला बऱ्याचशा मोठ्या रक्तवाहिन्या होत्या. त्यामुळे, शस्त्रक्रिया करताना थोडा तरी स्पर्श त्या रक्तवाहिन्यांना झाला असता तर खूप जास्त रक्तस्त्राव होण्याची शक्यता होती. तसंच, खूप मोठा ट्यूमर असल्याने अंडाशयाचा बराचसा भाग व्यापून गेला होता. श्वसनपटल, यकृताच्या सीमेपर्यंत हा ट्यूमर पोहोचला होता. ज्यावेळेस डॉक्टरांनी ट्यूमर काढण्याची प्रक्रिया सुरू केली तेव्हा हृदयाचे ठोके ही हातांना जाणवत होते. जवळपास 45 मिनिटांत ही शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली. भूलतज्ज्ञ डॉ. सुकृती यांनी या महिलेला भूल दिली. त्यानंतर ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली.

Surgery
'राज ठाकरेच काहीतरी करु शकतात', महाडच्या महापुरातून जीव वाचवण्यासाठी अक्षयचं Fb Live

शस्त्रक्रियेनंतर सोनोग्राफी केली तेव्हा बाळाच्या हृद्याचे ठोके सामान्य पडत होते. आई आणि बाळ दोघांची ही प्रकृती उत्तम आहे. अशा शस्त्रक्रियांचा अनुभव गाठीशी असल्यामुळे ही शस्त्रक्रिया देखील यशस्वी झाली आहे. - डॉ. राजश्री कटके, स्त्रीरोगतज्ज्ञ, जेजे रुग्णालय

मंगळवारी या महिलेची शस्त्रक्रिया केली गेली असून दोघांची प्रकृती स्थिर आहे. डॉ.  कटके यांनी या आधी ही अशा पद्धतीच्या दोन मोठ्या शस्त्रक्रिया केल्या होत्या.  ज्यात 6 किलो आणि 10 किलोचा ट्यूमर काढण्यात आला होता.

दरम्यान, रुग्णालयाच्या टीमने केलेल्या या शस्त्रक्रियेचे कौतुक रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रणजीत मानकेश्वर यांनी केले आहे. डॉ. कटके यांनी या आधी ही बर्‍याचशा यशस्वी शस्त्रक्रिया केल्या आहेत. ज्यामुळे महिलांचा जीव वाचवता आले आहे असे डॉ. मानकेश्वर यांनी साांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com