esakal | कोरोनामुळे १०० वं अखिल मराठी नाट्य संमेलन ढकललं पुढे
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोनामुळे १०० वं अखिल मराठी नाट्य संमेलन ढकललं पुढे

कोरोनामुळे १०० वं अखिल मराठी नाट्य संमेलन ढकललं पुढे

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई - चीनमधून जगभरात पोहोचलेला कोरोनाचा संसर्ग भारतात आणि महाराष्ट्रातही झालाय. त्यामुळे अनेक मोठे कार्यक्रम पुढे ढकलण्यात येतायत. या महिन्याच्या अखेरीला सुरू होणारे शंभरावे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन नियोजनानुसारच होईल, अशी ग्वाही अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी बुधवारी (ता. 11) पत्रकार परिषदेत दिली. मात्र आता यामध्ये बदल करून १०० वे नाट्य संमेलन पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. नाट्य परिषदेचे अध्यक्ष नवनाथ कांबळी यांनी पत्रक प्रसिद्ध करून याबद्दल माहिती दिली. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता नाट्य संमेलन पुढे ढकलण्यात आलं आहे. 

"माझ्या घोषणांमुळे महाराष्ट्रात महाराष्ट्रात कोरोनाचे कमी रुग्ण" - रामदास आवठवले

नाट्य संमेलनाचा राज्यव्यापी कार्यक्रमही जाहीर करण्यात आला होता. शतकमहोत्सवी अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन संपूर्ण राज्यात होणार होतं.  27 मार्चला सांगली येथे कल्पद्रुम क्रीडांगणात नाट्य संमेलनाचे आयोजित करण्यात आलं होतं. राज्यभरातील 11 ठिकाणांसह तमिळनाडूतील तंजावर येथील विविध कार्यक्रमांचा समावेश होता तर नाट्य संमेलनाचा समारोप 14 जूनला मुंबईत होणार होता.

असा होता कार्यक्रम 

 • कोल्हापूर : 30 मार्च ते 2 एप्रिल - नाट्यजागर; 3 ते 5 एप्रिल - नाट्य संमेलन 
 • माणगाव (रायगड) : 6 ते 9 एप्रिल - नाट्यजागर; 10 ते 12 एप्रिल - नाट्य संमेलन 
 • नांदेड : 13 ते 16 एप्रिल - नाट्यजागर; 17 ते 19 एप्रिल - नाट्य संमेलन 
 • सोलापूर : 20 ते 23 एप्रिल - नाट्यजागर; 24 ते 26 एप्रिल - नाट्य संमेलन 
 • नगर : 27 ते 30 एप्रिल - नाट्यजागर; 1 ते 3 मे - नाट्य संमेलन 
 • लातूर : 4 ते 7 मे : नाट्यजागर; 8 ते 10 मे - नाट्य संमेलन 
 • कल्याण : 11 ते 14 मे - नाट्यजागर; 15 ते 17 मे - नाट्य संमेलन 
 • नाशिक : 18 ते 21 मे - नाट्यजागर, 22 ते 24 मे - नाट्य संमेलन 
 • बारामती : 25 ते 28 मे - नाट्यजागर; 29 ते 31 मे - नाट्य संमेलन 
 • चंद्रपूर : 1 ते 4 जून - नाट्यजागर; 5 ते 7 जून - नाट्य संमेलन 
 • मुंबई (एनसीपीए) : 8 ते 11 जून - राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महोत्सव; समारोप - 12 ते 14 जून 

मन सुन्न करणारी घटना : ...म्हणून मित्रांनी त्याची पॅन्ट खाली ओढून त्याचं गुप्तांग

50 कोटींचे अंदाजपत्रक 

नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाच्या बैठकीत नाट्य संमेलनाच्या खर्चासाठी 50 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सर्वसहमतीने मंजूर करण्यात आले. नाट्य संमेलनातील पहिल्या पर्वासाठी 27 ते 30 कोटी रुपये खर्च येईल, असा प्राथमिक अंदाज आहे. स्थानिक संस्था त्यांच्या कार्यक्रमांचा भार उचलणार आहेत. मध्यवर्ती संस्थेतर्फे होणाऱ्या कार्यक्रमांचा खर्च मध्यवर्ती शाखा करेल, अशी माहिती प्रसाद कांबळी यांनी दिली आहे. 

100th akhil bharatiy marathi natya samelan 2020 postponed due to corona threat