11 टक्के उच्च रक्तदाबाच्या रुग्णांचा कोरोनाने मृत्यू; तज्ज्ञांची माहिती

11 टक्के उच्च रक्तदाबाच्या रुग्णांचा कोरोनाने मृत्यू; तज्ज्ञांची माहिती
11 टक्के उच्च रक्तदाबाच्या रुग्णांचा कोरोनाने मृत्यू; तज्ज्ञांची माहिती

मुंबई : कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये 11 टक्के प्रमाण हे उच्च रक्तदाबाच्या रुग्णांचे असल्याचे समोर आले आहे. कोरोना मृत्यू निरीक्षण समितीतील डॉ. अविनाश सुपे यांनी याबाबात माहिती दिली. उच्च रक्तदाबावर वेळीच उपचार केल्यास अन्य गंभीर आजारांचा संसर्ग तीव्रतेने होत नाही, हीदेखील बाब समोर येत आहे. 

दरवर्षी 17 मे रोजी जागतिक उच्च रक्तदाब दिन पाळला जातो. नवनवीन उद्‌भवणाऱ्या आजारांनाही उच्च रक्तदाब पोषक ठरतो, त्यात रुग्णाचा बळी जातो. यावर कोरोना मृत्यू निरीक्षण समितीचे डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले, की हायपर टेन्शन रुग्णांना कोरोना संसर्ग झाल्यास गंभीर परिणाम होण्याची शक्‍यता आहे. उच्च रक्तदाबाचे रुग्ण, हृदय विकाराच्या रुग्णांवर कोरोनाचा परिणाम होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे डॉ. सुपे म्हणाले. 

उच्च रक्तदाब म्हणजे शरीरातील रक्तवाहिन्यांमधून जेव्हा रक्त वहन करत असते तेव्हा रक्तवहनाचा प्रचंड दाब रक्तवाहिन्यांच्या भिंतींवर पडत असतो. जेव्हा हृदय आरामदायी पूर्वस्थितीत येते तेव्हा रक्तवाहिन्यांच्या अंतर-स्तरावरील दाब कमी होतो त्याला डायास्टोलिक रक्तदाब असे म्हणतात. उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तीच्या हृदयाला काम करण्यास खूप कष्ट करावे लागतात. त्यामुळे हृदय मोठे आणि जाड होऊ शकते. त्याची कार्यक्षमता कमी कमी होत जाते. त्यामुळे हृदयाचे पंपिंग कमी होते. याला "हार्ट फेल्युअर' म्हणत असल्याचे एच. एन. रिलायन्स हॉस्पिटलचे कार्डिओ थोरॅसिक सर्जन डॉ. बिपीनचंद्र भामरे यांनी सांगितले. 

व्यसनांपासून दूर राहा 
प्रत्येक व्यक्तीने आहार-विहार-विचार-आचार यांच्यावर नियंत्रण ठेवावे. व्यसनांना दूर ठेवावे. मद्यपान, धूम्रपान टाळावे. याशिवाय नियमित आरोग्य तपासणी करून घ्यावी. रक्तदाब असल्याचे निदान झाल्यास डॉक्‍टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार करावेत, असा सल्ला ग्लोबल रुग्णालय वरिष्ठ हृदयरोगतज्ज्ञ डॉ. प्रवीण कुलकर्णी यांनी दिला आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com