लॉकडाऊनमध्ये मध्य रेल्वे ठरली जीवनवाहिनी; 11,400 टन जीवनावश्‍यक वस्तूंची वाहतूक

प्रशांत कांबळे
Monday, 31 August 2020

लॉकडाऊन व त्यानंतरच्या अनलॉक काळात मध्य रेल्वे वेळोवेळी आपल्या पार्सल गाड्यांसह देशभरात सातत्याने जीवनावश्‍यक वस्तूंचा पुरवठा करत आहे. रेल्वेच्या मुंबई विभागाने एप्रिल ते 29 ऑगस्ट या कालावधीत 356 सेवांसह 11 हजार 400 टन जीवनावश्‍यक वस्तूंची मालवाहतूक केली आहे. 

मुंबई : लॉकडाऊन व त्यानंतरच्या अनलॉक काळात मध्य रेल्वे वेळोवेळी आपल्या पार्सल गाड्यांसह देशभरात सातत्याने जीवनावश्‍यक वस्तूंचा पुरवठा करत आहे. रेल्वेच्या मुंबई विभागाने एप्रिल ते 29 ऑगस्ट या कालावधीत 356 सेवांसह 11 हजार 400 टन जीवनावश्‍यक वस्तूंची मालवाहतूक केली आहे. 

ही बातमी वाचली का? मेट्रो सुरू झाली तरी उपयोग काय? व्हायचे तेच होणार, प्रवाशांची संतप्त प्रतिक्रिया!

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) मुंबई व कल्याण येथून जाणाऱ्या मध्य रेल्वेच्या पार्सल गाड्यांमधून हजरत निजामुद्दीन, शालीमार, हावडा, सिकंदराबाद, चेन्नई, वाडी, नागपूर अशा अनेक ठिकाणी इलेक्‍ट्रॉनिक वस्तू, मशिनरीचे भाग, छापील साहित्य आणि टपाल बॅग अशा अंदाजे 8 हजार 8900 टन जड पार्सलची वाहतूक केली आहे. 

ही बातमी वाचली का? कोरोनाकाळात प्रशासन व्यग्र आणि भूमाफिया सक्रीय; नवी मुंबईत उभारतायत अनधिकृत इमारती

या काळात नाशवंत वस्तू व औषधांची वाहतूक करणे एक आव्हानात्मक काम होते. मात्र मध्य रेल्वेने देशाच्या विविध भागात 1 हजार 10 टन खाद्यपदार्थ, पेरीशेबल्स, 817 टन औषधे, आणि 673 टन रुग्णालयीन वस्तू, वैद्यकीय व शल्य चिकित्सा उपकरणांची वाहतकू केली आहे, असे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.
----------------------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 11,400 tonnes of essential goods transported by Central Railway in lockdown