
मुंबई : बेस्टची भाडेवाढ झाली त्या दिवशी बेस्टच्या ताफ्यात २७२१ बसगाड्या होत्या. आत त्यांची संख्या कमी झाली असून बसची संख्या २५९३ झाली आहे. गेल्या महिनाभरात बेस्टच्या ताफ्यात १२८ बस कमी झाला असल्याची माहिती बेस्टच्या सुत्रांनी दिली. बसची संख्या दिवसेंदिवस कमी होत असल्याने मुंबईकरांचे हाल होत आहेत.