esakal | गुड न्यूज... वरळीतील 129 जण क्वारंटाईनमधून मुक्त
sakal

बोलून बातमी शोधा

संग्रहित छायाचित्र

कोव्हिड 19 च्या संसर्गामुळे गाजलेल्या वरळीत बुधवारी मात्र आनंदाची बातमी आली. कोरोना संशयित 129 रुग्णांना क्वारंटाईनमधून मुक्त करण्यात आल्याने  वरळीवासीयांनी  त्यांचे टाळ्यांच्या गजरात स्वागत केले

गुड न्यूज... वरळीतील 129 जण क्वारंटाईनमधून मुक्त

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई : वरळी कोळीवाड्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने चिंता व्यक्त केली जात होती. कोव्हिड 19 च्या संसर्गामुळे गाजलेल्या वरळीत बुधवारी मात्र आनंदाची बातमी आली. कोरोना संशयित 129 रुग्णांना क्वारंटाईनमधून मुक्त करण्यात आल्याने  वरळीवासीयांनी निश्वास सोडला. क्वारंटाईनमुक्त झालेल्यांचे बुधवारी स्वागत करण्यात आले. वरळीतील रहिवाशांबरोबरच बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी त्यांच्यासाठी टाळ्यांचा गजर केला. 

महत्त्वाचे : कोरोनाचा आलेख खाली आणण्यासाठी सर्वांनी मदत करा

वरळी कोळीवाडा परिसरातील कोरोना हायरिस्क झोनमधील 129 व्यक्तींना खबरदारीचा उपाय म्हणून वरळीतील पोद्दार रुग्णालयात विलीगीकरण करण्यात आले होते. 14 दिवसांच्या विलगीकरणानंतर परतलेल्या रहिवाशांचे बुधवारी टाळ्या वाजवून स्वागत करण्यात आले. सोमवारी आणि मंगळवारी सर्वांचे स्वॅब नमुने तपासणी केल्यावर दोन्ही अहवाल निगेटिव्ह आले.  सर्व जण सुखरूप घरी आल्यावर शेजाऱ्यांनीही मोठ्या मनाने त्यांचे स्वागत केले. तत्पूर्वी वरळी कोळीवाडा परिसरातील 8 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन परत आले आहेत

हे वाचलं का? : पाॅझिटिव्ह बातमी ः मुंबईतील मृत्युदर नियंत्रणात येतोय का?

उपकार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांनी 129 जणांच्या घरवापसीला दुजोरा दिला. मात्र, क्वारंटाईनमधून नेमक्या किती जणांना डिस्चार्ज दिला याची माहिती नंतर देण्यात येईल, असे सांगण्यात आले.

loading image