esakal | पॉझिटिव्ह बातमी : मुंबईतील मृत्युदर नियंत्रणात येतोय का ? 
sakal

बोलून बातमी शोधा

पॉझिटिव्ह बातमी : मुंबईतील मृत्युदर नियंत्रणात येतोय का ? 

दिवसभरात दोघांचा मृत्यू; 183 नवे रुग्ण, बाधितांची संख्या 1936 

पॉझिटिव्ह बातमी : मुंबईतील मृत्युदर नियंत्रणात येतोय का ? 

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई : मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असला, तरी मृत्यू नियंत्रणात आले आहेत. गेल्या आठवडाभरात दररोज सरासरी 8 ते 10 मृत्यू होत होते. बुधवारी हा आकडा दोनवर आल्याने मृत्युदर नियंत्रणात आणण्यात आरोग्य विभागाला यश मिळत असल्याचे दिसते. 

कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने होत असून, बाधितांची संख्या वाढत आहे. मृत्युदर वाढत असल्याने चिंतेत भर पडली होती. महिनाभरापूर्वी दिवसाला दोन असलेला मृत्युदर सातवर गेला होता. मागील सात दिवसांत कोरोनाने 71 बळी घेतले होते. मृत्यूचे प्रमाण दिवसाला पाचवरून 11 झाले होते. बुधवारी फक्त दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृत्युदर नियंत्रणात येत असल्याचे संकेत मिळत आहेत. 

मोठी बातमी - लॉकडाऊनमध्येही Tata Motors ने सुरु केली गाड्यांची विक्री; टाटा मोटर्सची एक नंबर आयडिया...

  • महापालिकेचे विशेष दवाखाने : 100 
  • सर्वेक्षण झालेल्या व्यक्ती : 3929 
  • तपासणीसाठी नमुने : 1541 
  • नवे संशयित रुग्ण : 261 
  • आतापर्यंत दाखल : 5379 
  • निर्जंतुकीकरण झालेल्या इमारती : 33,636

मुंबईत आतापर्यंत कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी 87 टक्के व्यक्ती 65 वर्षांवरील होत्या. त्यामुळे आजारी ज्येष्ठ नागरिकांची अधिक काळजी घेण्यात येत आहे. दोनच दिवसांपूर्वी कोरोना संसर्ग आणि मृत्युदर नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने तज्ज्ञ डॉक्‍टरांचे कृतिदल नेमले आहे. या टास्क फोर्सच्या मार्गदर्शनाखाली कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. 

मोठी बातमी - डिटेल नियमावली जाहीर; २० एप्रिलपासून काय सुरु, काय बंद... वाचा

मुंबईत बुधवारी कोरोनाचे 183 नवे रुग्ण सापडल्याने बाधितांची संख्या 1936 झाली आहे. दोघांचा मृत्यू झाल्यामुळे मृतांचा आकडा 113 वर गेला आहे. त्यापैकी एकाला दीर्घकालीन आजार होता, तर दुसऱ्याचा मृत्यू वार्धक्‍याशी संबंधित असल्याचे समजते. आतापर्यंत 181 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, बुधवारी 17 जणांना रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले. 

corona death rate of mumbai slightly coming down read what doctors are saying

loading image
go to top