esakal | कोरोनाचा आलेख खाली आणण्यासाठी सर्वांनी मदत करा 
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोनाचा आलेख खाली आणण्यासाठी सर्वांनी मदत करा 

मुख्यमंत्र्यांचे कॉर्पोरट रुग्णालयांना आवाहन 

कोरोनाचा आलेख खाली आणण्यासाठी सर्वांनी मदत करा 

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई : कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांवरील उपचारांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी (ता. 15) व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे मुंबईतील कॉर्पोरेट रुग्णालयांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. या चर्चेत टास्क फोर्समधील डॉक्‍टरही सहभागी झाले होते. कोरोनाचा मुंबई-पुण्यातील वाढता आलेख खाली आणायचा आहे. त्यासाठी सर्वांनी मदत करावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. 

मोठी बातमी आम्हाला घरी जाऊ द्या हो! परराज्यातील 109 मजूरांचे उपोषण

झूम व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या बैठकीत सैफी, फोर्टिस, वोक्‍हार्ट, हिंदुजा, हिरानंदानी, कोकिळाबेन, नांवाती, सेव्हन हिल्स या रुग्णालयांचे मुख्य कार्यकारी अधिकारी सहभागी झाले होते. राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, सचिव सौरव विजय, सुरेश काकाणी, अश्‍विनी भिडे, एन. रामास्वामी, डॉ. संजय ओक आदी उपस्थित होते. कोरोनाच्या रुग्णांवरील उपचार व देखभाल महत्त्वाची आहे. मृत्यूंना आळा घालणे आणि रुग्णांना लवकर बरे करणे हे सरकार आणि वैद्यकीय क्षेत्रासमोरील आव्हान आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. 

उपचारांदरम्यान रुग्णांची काळजी, वैद्यकीय उपकरणांची आवश्‍यकता, प्रमाणित उपचारपद्धती, आयसीयू खाटांची उपलब्धता आदी मुद्द्यांवर चर्चा झाली. कोविड-19 वरील उपचारांसाठी निश्‍चित केलेल्या तीन प्रकारांच्या रुग्णालयांचे नियोजन व समन्वयाबाबत विचारविनिमय झाला. काही दिवसांत आपल्याला कोरोनाचा आलेख खाली आणायचाच आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

मोठी बातमी सोशलमीडियावर अफवा पसरवत असाल तर खबरदार! वाचा बातमी सविस्तर

जागरूकता वाढली 
कोरोनाबाधितांवर उपचार करणारे डॉक्‍टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे आरोग्य चांगले राहणे सर्वांत महत्त्वाचे आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. कोरोना चाचण्यांची संख्या वाढली आहे. जागरूकता वाढल्याने लक्षणे दिसताच नागरिक रुग्णालयांत येत आहेत. महाराष्ट्रात कोणत्याही परिस्थितीत उत्तम रुग्ण व्यवस्थापन झाले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

to bring corona graph down sm uddhav thackeray seeks help from private hospitals

loading image
go to top