ठाण्यात महिन्याभरात 130 वणवे, इतके हेक्टर क्षेत्र आगीत भस्म  

vanava
vanava

ठाणे : कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आल्याने सरकारी कर्मचाऱ्यांच्या कार्यालयातील संख्येवर निर्बंध आहेत, असे असताना जिल्ह्यातील ठाणे वन विभागाच्या क्षेत्रात गेल्या महिन्याभरात 130 वणवे लागले असून 158.29 हेक्टर क्षेत्र त्यात बाधित झाले आहे. मात्र, वन विभागाच्या दक्षतेमुळे लागलेले वणवे आटोक्यात आणल्यामुळे मोठ्या प्रमाणात क्षेत्र आगीत भस्मसात होण्यापासून वाचले आहेत, अशी माहिती उपवन संरक्षक जितेंद्र रामगावकर यांनी दिली. 

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी 23 मार्चपासून ठाणे जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली. याकालावधीत अत्यावश्यक सेवेतील अस्थापनांव्यतिरिक्त सर्व अस्थापना बंद ठेवण्यात आल्या आहेत. तसेच सर्व सरकारी कार्यालयातील कर्मचारी संख्येवर निर्बंध घालण्यात आले असून केवळ 5 टक्के कर्मचाऱ्यांवर सरकारी कार्यालयातील कामांचा गाडा सध्याच्या घडीला हाकण्यात येत आहे. त्यानुसार ठाणे वन विभागातील कार्यालयांमध्ये देखील अपुऱ्या कर्मचारी संख्येत कामे करण्यात येत आहे. त्यात 24 मार्च 2020 ते 20 एप्रिल 2020 या महिन्याभराच्या कालावधीत ठाणे, कल्याण, मुरबाड, टोकावडे, बदलापूर, पडघा,  भिवंडी आणि मांडवी या वनपरिक्षेत्रात 130 वणवे लागल्याच्या घटना घडल्या. या वणव्यांमध्ये 158.29 हेक्टर क्षेत्र आगीत भस्मसात झाले आहे. ठाणे वनविभागात वनक्षेत्रात वन वणवे विझविण्याासाठी क्षेत्रिय कर्मचारी यांनी जीवाची बाजी लावून वणवा वेळीच आटोक्यायत आणला असल्याची माहिती उप वनसंरक्षक रामगावकर यांनी दिली.

जिल्ह्यात क्षेत्रनिहाय लागलेले वणवे
वनपरिक्षेत्र - लागलेल्या आगी - जळीत क्षेत्र (हे.)
ठाणे - 1 - 1.000
कल्याण - 21 - 37.500
मुरबाड पुर्व - 23 - 13.380
मुरबाड ‍प. - 37 - 19.000
टोकावडे दक्षिण - 3 - 7.000
टोकावडे उत्तर - 3 - 6.500
बदलापूर - 13 - 44.000
पडघा - 8 - 7.900
भिवंडी - 20  - 19.010
मांडवी - 1 - 3.000
एकुण  - 130  - 158.29

130 fires in a month in Thane, 158.29 hectare area in the district was gutted by fire

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com