
मुंबई : आषाढी एकादशी निमित्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक मोठ्या संख्येने पंढरपूरला जातात आणि विठुरायाच्या चरणी नतमस्तक होतात. वारकऱ्यांचा ओघ बघता रेल्वे, बसेस ची सोय शासनाकडून दरवर्षी केली जाते. मुंबईतील भाविकांना आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाण्यासाठी एसटी प्रशासनाकडून विशेष व्यवस्था करण्यात आली असून पंढरपूर करिता जादा बस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.