धक्कादायक! गेल्या 48 तासांत तब्बल 'इतक्या' पोलिसांना कोरोनाची लागण; आणखी एका पोलिसाचा मृत्यू..

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जून 2020

मुंबईतील धारावी पोलिस ठाण्यात कार्यरत पोलिस नाईकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. ते 55 वर्षांचे होते.

मुंबई: मुंबईतील धारावी पोलिस ठाण्यात कार्यरत पोलिस नाईकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. ते 55 वर्षांचे होते. त्यामुळे मुंबईतील कोरोनामुळे मत झालेल्या पोलिसांचा आकडा 38 वर पोहोचला आहे. राज्यात गेल्या 48 तासांत 150 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे.

मृत पोलिसाला 14 मेला सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना चर्नी रोड येथील हरकिशन दास रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.रविवारी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

हेही वाचा: बापरे ! मुंबईत 'या' भागांमध्ये कोरोनाची पुन्हा लाट; आरोग्य खात्याची चिंता वाढली..

मुळचे सातारा येथील आसनगाव येथील रहिवासी असलेले  ते सध्या माहिम पोलिस वसाहतीत वास्तव्याला होते. गेल्या 48 तासात राज्यातील 150 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे.

आतापर्यंत मुंबईतील 2550 पोलिसांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील 1750 पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे. 692 पोलिस सध्या कोरोनावर उपचार घेत आहेत. राज्य पोलिस दलातील 4100 पोलिसांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील बहुसंख्या पोलिसांनी कोरोनावर मात केली असून सध्या एक हजार पोलिस सध्या उपचार घेत आहेत.

हेही वाचा: प्लाझ्मा थेरेपी ठरतेय गुणकारी; नायर रुग्णालयातून तब्बल 'इतके' रुग्ण कोरोनामुक्त...

मुंबईतील कोरोनावर उपचार घेणा-या पोलिसांसाठी कोविड केअर सेंटर उभारण्यात आली आहेत. याशिवाय हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. पोलिस यंत्रणेकडून रेमदेसीवीर व टॉसिलिझ्युमॅब सारखी औषधीही तात्काळ उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

150 police corona positive in last 48 hours


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 150 police corona positive in last 48 hours