पेणकरांची चिंता वाढली! तालुक्यात एकाच दिवशी आढळले 16 नवे कोरोनाबाधित

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 27 June 2020

बेणसे गावातील एका व्यक्तीचे पाच-सहा दिवसांपूर्वी नवी मुंबईतील रुग्णालयात निधन झाले होते. या व्यक्तीच्या मृत्यूपूर्वी त्यांच्या संपर्कात आलेल्या पत्नी, बहीण, मुलगा, घरकाम करणारी बाई आणि दुकानात काम करणारा कामगार अशा एकूण पाच जणांना कोरोनाची लागण लागली आहे.

वडखळ : पेण तालुक्यात शनिवारी (ता. 27) कोरोनाचे 16 पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आल्याने पेणकरांच्या चिंतेत भर पडली आहे. यामध्ये बेणसे येथील 5, तांबडशेत येथील 1, रोहिदास नगर येथील 5, हनुमान आळी येथील 2, सागर सोसायटी येथील 2 आणि चिंचपाडा येथील 1 रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 86 वर पोहोचली आहे.

हेही वाचा: मुंबईतील कोरोना रुग्णांमध्ये दिसून येतंय 'हे' नवीन लक्षण, डॉक्टर्स देखील झालेत हैराण..

बेणसे गावातील एका व्यक्तीचे पाच-सहा दिवसांपूर्वी नवी मुंबईतील रुग्णालयात निधन झाले होते. या व्यक्तीच्या मृत्यूपूर्वी त्यांच्या संपर्कात आलेल्या पत्नी, बहीण, मुलगा, घरकाम करणारी बाई आणि दुकानात काम करणारा कामगार अशा एकूण पाच जणांना कोरोनाची लागण लागली आहे. या सर्वांना पुढील उपचारासाठी पनवेलला हलविण्यात आले आहे. तांबडशेत येथील एका 34 वर्षीय व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

मोठी बातमी - मुंबईत कोरोना संक्रमणाची बाधा आणि प्रसाराचीही होणार उकल, आणखी १० हजार व्यक्तींवर होणार 'हे' सर्वेक्षण..

रोहिदास नगर येथे पाच रुग्ण आज आढळले असून यामध्ये 38 वर्षीय महिला, 15 वर्षीय आणि 9 वर्षीय मुलगे, 13 वर्षीय आणि 5 वर्षीय मुली अशा पाच जणांना समावेश आहे. हनुमान आळी येथील 20 वर्षीय तरुणी आणि 45 वर्षीय महिला अशा दोघांना कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आहे. तर सागर सोसायटीत राहणार्‍या 36 वर्षीय महिला आणि 12 वर्षीय मुलगी अशा दोन जणांना कोरोनाची लागण झाली आहे. याव्यतिरिक्त चिंचपाडा येथील 40 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे.

हेही वाचा: कोरोना मागोमाग लागूनच मुंबईवर येऊ शकतं 'हे' मोठं संकट; मुंबईकरांना वाचवणार आता एकच गोष्ट...

तालुक्यांतील 12 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले असल्याची माहिती तहसीलदार अरुणा जाधव यांनी दिली. दरम्यान, पेण तालुक्यातील कोरोनाचा वाढता विळखा लक्षात घेऊन पेण शहर 28 जूनपर्यंत बंद ठेवण्यात आले आहे.

16 new coronaviruses positive were found in the pen on the same day


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 16 new coronaviruses positive were found in the pen on the same day