चिंताजनक! ठाणे जिल्ह्यात 24 तासांत 161 नवे कोरोनाबाधित, जाणून घ्या एकूण रुग्णसंख्या

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 13 May 2020

जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून मागील 24 तासांत 161 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली असून 5 जणांचा मृत्यू झाला आहे

ठाणे : जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून मागील 24 तासांत 161 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली असून 5 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये ठाणे महापालिकेत 3 तर, कल्याण डोंबिवलीत 2 जणांचा मृत्यू झाला आहे. या आकडेवारीमुळे जिल्ह्यातील संख्या 2 हजार 709 वर गेली असून  मृतांचा आकडा 80 झाला आहे.

हे वाचलत का  : अनेकांना जे जमत नाही ते 'या' तीन वर्षांच्या कबीरने केलं, पोलिसांनाही वाटलं लै भारी

मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांच्या आकडेवारीत होणारी वाढ मंगळवारनंतर बुधवारी देखील काहीशी घटली असल्याचे दिसून आले. बुधवारी (ता.13) ठाणे महापालिकाक्षेत्रात 47 कोरोनाबाधीतांची नोंद करण्यात आल्याने बाधितांचा आकडा 798 वर पोहोचला. तसेच मंगळवारी रात्री उशिरा 5 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली असून बुधवारी देखील तिघांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने मृतांचा आकडा 37 इतका झाला आहे. तर,  कल्याण डोंबिवलीत 20 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली असून दोघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे बाधितांचा आकडा 385 इतका झाला असून  मृतांचा आकडा 7 झाला आहे. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात 54 नवे कोरोनाबाधित समोर आल्याने बाधितांची संख्या 910 इतकी झाली.

महत्वाची बातमी : मुख्यमंत्री कार्यालयाला टॅग करत अमोल कोल्हेंनी राज्य सरकारकडे केली 'ही' मागणी 

उल्हानगरमध्ये तब्बल 18 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आल्याने बाधितांचा आकडा 68 झाला आहे. तसेच मीरा भाईंदरमध्ये तिघांची नोंद करण्यात आल्याने बाधितांचा आकडा 265 झाला आहे. भिवंडी महापालिका क्षेत्रात 4 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आल्याने बाधितांचा आकडा 32 झाला आहे. बदलापूरमध्ये देखील 6 रुग्णांची नोंद करण्यात आल्याने तेथील बाधितांचा आकडा 68 झाला आहे. तसेच  ठाणे ग्रामीण भागात देखील 8 नवे कोरोनाबाधित समोर आले असून तेथील संख्या 120 झाली आहे.

161 new corona positive in Thane district in 24 hours, read full story


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 161 new corona positive in Thane district in 24 hours, read full story