esakal | बेस्टच्या १९० कर्मचा-यांना कोरोनाची लागण; तर 'इतके' कर्मचारी झाले कोरोनमुक्त
sakal

बोलून बातमी शोधा

best bus

अत्यावश्यक सेवेसाठी तैनात असलेल्या बेस्टच्या १९० कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील आठ जणांचा मृत्यू झाला असून १०० रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. बेस्टध्ये कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.  

बेस्टच्या १९० कर्मचा-यांना कोरोनाची लागण; तर 'इतके' कर्मचारी झाले कोरोनमुक्त

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई: अत्यावश्यक सेवेसाठी तैनात असलेल्या बेस्टच्या १९० कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील आठ जणांचा मृत्यू झाला असून १०० रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. बेस्टध्ये कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.  

कोरोनाच्या रुग्णांचे प्रमाण  वाढते आहे. तशी अत्यावश्यक सेवा देणा-या कर्मचा-यांनाही कोरोनाची लागण होण्याची संख्याही वाढत आहे. अत्यावश्यक सेवा देणाऱ्या बेस्टच्या कामगारांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढल्याने बेस्टपुढेही आव्हान निर्माण झाले आहे.

मोठी बातमी! मुंबईची लाईफलाईन टप्प्याटप्प्यानं लवकरच सुरु होणार? 

अत्यावश्यक सेवेतील कर्मचा-यांना कामाच्या ठिकाणी सोडण्यासाठी दिवस-रात्र काम करणा-या बेस्टमध्येही कोरोना संसर्गाचा शिरकाव झाला आहे. बेस्टमधील आतापर्यंत १९० कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी ७० टक्के  चालक आणि वाहकांचा समावेश आहे. तर उर्वरित कर्मचारी हे तांत्रिक आणि विद्युत विभागातील आहेत.

रिक्षा, टॅक्सी, ओला, रेल्वे बंद असल्यामुळे याचा भार बेस्टवर आला आहे.  दररोज १ हजार ५०० बसगाड्या धावत आहेत. त्यामुळे तीन हजारपेक्षा जास्त चालक – वाहक आपले कर्तव्य बजावत आहेत. याव्यतिरिक्त वाहतूक निरिक्षक आणि परिवहन विभागाबरोबरच विद्युत विभागातील कर्मचारीही कार्यरत आहेत.

काय सांगता! ऑनलाईन मिळतोय प्लाज्मा? जाणून घ्या यामागचं सत्य..

अपंग कर्मचाऱ्यांसह उच्च रक्तदाब, मधुमेह इत्यादी आजार असलेल्या दीड हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना घरात राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान,  कोरोनावर मात करण्याचे प्रमाण ४८ टक्के असल्याचे बेस्टच्या जनसंपर्क विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले. 

190 employess of BEST tasted corona positive read full story

loading image