मंदिरे उघडण्यासाठी विरारमधील पुजाऱ्याची 21 दिवस कठोर तपश्चर्या; सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न

प्रसाद जोशी
Tuesday, 6 October 2020

देऊळ बंदच असल्याने आता विरार खानिवडे येथील शिव मंदिरातील एका पुजाऱ्याने खडी तपश्चर्या करण्याचा निश्चय करत राज्य सरकारचे लक्ष वेधले आहे.

वसई - कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यावर सर्व व्यवहार ठप्प झाले होते. नंतर टप्प्याटप्प्याने शिथिल देखील करण्यात आले. मात्र देऊळ बंदच असल्याने आता विरार खानिवडे येथील शिव मंदिरातील एका पुजाऱ्याने खडी तपश्चर्या करण्याचा निश्चय करत राज्य सरकारचे लक्ष वेधले आहे.

आयडॉलच्या परीक्षांसाठी विना टेंडर कंत्राट दिल्याचा मनविसेनेचा गंभीर आरोप; कंपनीवर कारवाई करण्याची मागणी 

हॉटेलसह औद्योगिक क्षेत्र, वाहतूक यासह अन्य व्यवहाराला सरकारने सुरु करण्याची अनुमती दिली. परंतु पर्यटन व देऊळ याबाबत अद्यापही लॉकडाऊनच आहेत. लॉकडाऊनपासून आतापर्यंत अनेक उत्सवात श्रद्धाळूंना देवळात जात येत नाही. काही राजकीय पक्षाने देखील मंदिरे भक्तांसाठी खुली करा म्हणून घंटानाद, आंदोलने करून मागणी केली परंतु अद्यापही निर्णय घेण्यात आला नाही. देऊळ बंदचा फटका साधू आणि पुजाऱ्यांना देखील बसला आहे. मंदिरे तात्काळ उघडण्याची मागणी खानिवडे येथील शिवमंदिरातील योगी श्री शिवनाथ या पुजाऱ्याने केली आहे. यासाठी त्यांनी  खडी तपश्चर्या हे अस्त्र अवलंबविले आहे. एकूण 21 दिवस ते एकाच पायावर उभे राहणार असून फक्त फलाहार घेणार आहेत. 

दोन्ही राजे नवी मुंबईत एकत्र येणार; उदयनराजे आणि संभाजीराजेंच्या नेतृत्वाखाली ठरणार मराठा आरक्षणाची रणनिती

कोरोनाचा पार्श्वभूमीवर महाराष्ट्रसह इतर राज्यांमध्ये गेल्या सहा महिन्यांपासून मंदिरेही बंद ठेवण्यात आली आहेत. राज्यात अनलॉकची  प्रक्रिया  सुरू झाली असली तरी मात्र मंदिर उघडण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळे आता मंदिरे उघडण्याची मागणी जोर धरू लागली असल्याचे दिसून येत आहे आता राज्य सरकार या पुजाऱ्याचे गाऱ्हाणे तरी ऐकेल का याकडे भक्तांचे लक्ष लागले आहे.

 

सर्व कामधंदे सुरु होत आहेत परंतु देवळांना अद्यापही टाळेच आहे. सरकारने देवळाची दारे खुली करण्याची अनुमती देण्यात यावी यासाठी मी एका पायावर उभा राहिलो आहे. देव आणि भक्त यांचा मिलाप सरकारने लवकरात लवकर घडवून आणावा.
योगी श्री शिवनाथ
पुजारी ,शिवमंदिर , खानिवडे.

-----------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 21 days rigorous penance of priest in Virar to open temples