esakal | धक्कादायक बातमी! मुंबईत तब्बल 'इतके' टक्के कोरोना रुग्ण ऑक्सिजनवर.. 
sakal

बोलून बातमी शोधा

oxygen cylinder

मुंबईतील कोरोना बाधित रुग्णांपैकी 21 टक्के रुग्ण हे ऑक्सिजनवर आहेत.

धक्कादायक बातमी! मुंबईत तब्बल 'इतके' टक्के कोरोना रुग्ण ऑक्सिजनवर.. 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई: मुंबईतील कोरोना बाधित रुग्णांपैकी 21 टक्के रुग्ण हे ऑक्सिजनवर आहेत.आठवडाभरात ही संख्या 13 टक्क्यांवरुन 21 टक्क्यांवर पोहचली आहे. तर 94 टक्के आयसीयू खाटा व्याप्त असून अवघे चार टक्के व्हेटिलेंंटर रिक्त आहेत. तर 957 रुग्ण हे अत्यावस्थ आहेत. 

महापालिकेने प्रसिध्द केलेल्या आकडेवारी नुसार शुक्रवारपर्यंत मुंबईत 64 हजार 68 रुग्णांची नोंद झाली आहे. तर त्यातील 32 हजार 257 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.28 हजार 388 रुग्ण रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

हेही वाचा: एचआयव्ही रुग्णांसाठी मुंबई महापालिकेचं कौतुकास्पद पाऊल; तब्बल 'इतक्या' रुग्णांना एआरटी‌ केंद्राची मदत..

मुंबईतील रुग्णालयंमध्ये व्हेटिलेटर आणि ऑक्सिजन बेडची संख्या या आठवड्यात वाढली आहे.13 जून रोजी मुंबईत 532 व्हेटिलेटर उपलब्ध होते.तर शनिवारी ही संख्या 701 वर पोहचली आहे .तर ऑक्सिजन बेडची संख्या 5 हजार 286  वरुन 7 हजार 275 वर आली आहे.सध्या 5 हजार 995 रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा केला जात आहे.

13 जून रोजी 28 हजार 682 रुग्णांवर उपचार सुरु होते.त्यातील 4 हजार 126 रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा केला जात होता. कोविडचा विषाणू श्वसन क्रियेवर प्रभाव करत असल्याने रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासत आहे.त्यासाठीच ऑक्सिजनची साठवण क्षमता वाढविण्यात आली आहे  असे पालिकेच्या एका अधिकार्याने सांगितले .

.हेही वाचा: चीनविरोधात संताप; मुंबईत चिनी वस्तू नष्ट करण्याचे आंदोलन

कोविड रुग्णांसाठी सध्या 1219 आयसीयू बेड्स आहेत.तर, आयसीयूत 1147 रुग्ण आहेत.तर 701 व्हेटिलेंटर असून 678 रुग्ण व्हेटिलेटरवर आहेत. 

21 percent corona patients are on oxygen in mumbai