धक्कादायक! वांद्रे-वरळी सी लिंकवर 25 वर्षीय तरुणाची आत्महत्या 

death
death

मुंबई : वांद्रे-वरळी सी लिंकवर एका 25 वर्षीय तरुणानं आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सी लिंकवरुन उडी मारुन या तरुणानं आपलं जीवन संपवलं आहे.  केवल कासले अशी मृत तरुणाची ओळख पटली आहे. हा तरुण बाईकनं सी लिंकवर गेला. तिथे त्यानं आपली गाडी पार्क केली आणि नंतर पाण्यात उडी मारली, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. गुरुवारी संध्याकाळ 4.35 च्या सुमारास ही घटना घडली आणि शुक्रवारी रात्री उशिरा त्याचा मृतदेह शिवाजी पार्कच्या सीमेकडील भागात सापडला.

अशा घटना थांबवण्यासाठी आम्ही सी लिंकवर सुरक्षा रक्षक तैनात केले असल्याचं एका अधिकाऱ्यानं सांगितलं. सुरक्षा रक्षकानं त्याला गाडी थांबवताना पाहिलं. तेव्हा त्याच्या लक्षात आलं काहीतरी चुकीचं घडणार आहे. केवल हा सुरक्षा रक्षकापासून १०० मीटरवर होता. त्यानं त्याला थांबवण्याचा प्रयत्नही केला. मात्र कासले थांबला नाही त्यानं लगेचच पाण्यात उडी घेतली, असं अधिकाऱ्यानं म्हटलं आहे. 

सुरक्षा रक्षकानं मुंबई पोलिस कंट्रोल रूमला याबाबतची माहिती दिली, त्यानंतर वरळी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. सुरक्षा रक्षकानं दिलेल्या वर्णनाच्या आधारावर आम्हाला समजले की तो तरुण होता, असं एका अधिकाऱ्यानं सांगितलं. आम्ही त्याची केशरी रंगाची केटीएम बाईक देखील पाहिली. त्या गाडी नंबरच्या मदतीनं त्याची ओळख पटली. त्यानंतर अग्निशमन दलाचे अधिकारी आणि स्थानिक मच्छीमारांच्या मदतीनं त्याच्या मृतदेहाचा शोध घेण्यात आला, अशी माहिती अधिकाऱ्यानं दिली. कासले याचा मोठा भाऊ केतन, जो परेल येथे आपल्या मित्राला भेटायला आला होता. त्याला पोलिसांनी पोलिस स्टेशनमध्ये बोलावून घेतलं. केतननं आपल्या भावाची बाईक ओळखली आणि मृत व्यक्ती आपला भाऊ असल्याचं सांगितलं. 

पोलिसांनी सांगितलं, गुरुवारी दुपारी जेवण करुन कासले घरातून बाहेर पडला. त्याच्या कुटुंबियांनी सांगितलं की घरात त्याच वागणं एकदम व्यवस्थित होतं. तो कोणत्याही प्रकारे अस्वस्थ दिसत नव्हता. जेव्हा घरातले दुपारी जेवण करुन झोपले होते तेव्हा तो घरातून बाहेर पडला, असं पोलिसांनी सांगितलं. या आत्महत्येमागील कारण शोधण्यासाठी अधिकचा तपास सुरु करण्यात आला आहे. त्यानं कोणत्याही प्रकारची सोसाईट नोट लिहिलेली नाही. तसंच त्याच्या कुटुंबियातल्या सदस्यांनाही या आत्महत्येचं नेमकं कारण माहिती नसल्याचं पोलिसांनी म्हटलं. आता त्याच्या मित्रांची देखील चौकशी करणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं. 

मुंबई महाविद्यालयातून कासलेनं आपलं कॉमर्स विषयात गॅज्युएशन पूर्ण केलं आहे. ५७ वर्षीय त्याचे वडील बीएमसीमध्ये कर्मचारी आहेत. वडिलांच्या सेवानिवृत्तीनंतर पुढच्या वर्षी कासले वडिलांच्या जागी नोकरीला लागणार होता. पोलिसांनी सांगितले की, गुरुवारी आणि शुक्रवारी समुद्रात भरती असल्यामुळे त्याचा मृतदेह सापडला नाही. त्यानंतर शिवाजी पार्क इथल्या समुद्रकिनारी त्याचा मृतदेह सापडला. शिवाजी पार्क पोलिसांनी या आत्महत्या प्रकरणी अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे.

25 year old young men jumps off Bandra Worli sea link read full story

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com