26/11 Mumbai Attack 18th Anniversary : लाठी घेऊन कसाबच्या गोळ्या अंगावर झेलणारे तुकाराम ओंबळे अन् 'ती' ६० तासांची काळी रात्र! १८ वर्षांनंतरही मुंबईच्या जखमा ताज्या; तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणानंतर कुठवर पोहोचला न्याय?

२६ नोव्हेंबर २००८ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याला आज १८ वर्षे पूर्ण; १६६ निरपराध बळी, मुंबई पोलीस व जवानांचे सर्वोच्च बलिदान आणि भारताच्या बदललेल्या सुरक्षा धोरणाचा संपूर्ण आढावा.
18 years of 26/11 Mumbai terror attack; salute to the sacrifice of bravehearts!

18 years of 26/11 Mumbai terror attack; salute to the sacrifice of bravehearts!

Sakal

Updated on: 

भारताच्या आर्थिक राजधानीला हादरवून सोडणाऱ्या २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याला आज (२६ नोव्हेंबर) १८ वर्षे पूर्ण होत आहेत. २६ नोव्हेंबर २००८ च्या रात्री पाकिस्तानातून समुद्री मार्गाने आलेल्या १० सशस्त्र दहशतवाद्यांनी तब्बल ६० तास मुंबईला वेठीस धरले होते. या हल्ल्यात परदेशी नागरिकांसह १६६ निष्पाप लोकांचा बळी गेला, तर ३०० हून अधिक जण जखमी झाले. १८ वर्षे उलटली तरी त्या काळ्या रात्रीच्या जखमा आणि शूरवीरांच्या बलिदानाच्या आठवणी आजही प्रत्येक भारतीयाच्या मनात ताज्या आहेत.

Loading content, please wait...