सलाम त्या योद्ध्यांना! सायन रुग्णालयातील २६ डॉक्टरांची कोरोनावर मात, पुन्हा सेवेत रुजू 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 जुलै 2020

गेल्या तीन महिन्यात सायन रुग्णालयातील एकूण 133 डॉक्टर आणि 53 नर्सेसना कोरोनाचा संसर्ग झाला. लोकमान्य टिळक महानगरपालिका जनरल हॉस्पिटल, सायन येथील हे रुग्णालय शहरातील सर्वात व्यस्त  रुग्णालयांपैकी एक आहे.

मुंबई : कोरोना व्हायरसनं सर्वत्र थैमान घातलं आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा आकडा वाढताना दिसतोय. कोरोना व्हायसरचा मुंबईत जास्त प्रार्दुभाव पाहायला मिळतोय. व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध पातळीवर प्रयत्न केले जाताहेत. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी अहोरात्र मेहनत घेताना दिसताहेत. यात पोलिस, डॉक्टर, नर्स पालिका कर्मचारी गेल्या तीन महिन्यांपासून  सेवा बजावाहेत. त्यातही पोलिस असो वा डॉक्टर, नर्स यांनाही आपलं कर्तव्य बजावताना कोरोनाची लागण झाली आहे. अशातच आनंदाची बातमी म्हणजे, सायन रुग्णालयातील २६ निवासी डॉक्टरांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. कोरोनावर मात करुन हे डॉक्टर पुन्हा आपलं कर्तव्य बजावण्यासाठी सज्ज झालेत. 

मोठी बातमी हवामान विभागाचा रेड अलर्ट! अऱबी समुंद्रात येणार एवढ्या उंचीच्या लाटा

गेल्या तीन महिन्यात सायन रुग्णालयातील एकूण 133 डॉक्टर आणि 53 नर्सेसना कोरोनाचा संसर्ग झाला. लोकमान्य टिळक महानगरपालिका जनरल हॉस्पिटल, सायन येथील हे रुग्णालय शहरातील सर्वात व्यस्त  रुग्णालयांपैकी एक आहे. या रुग्णालयातील २६ निवासी डॉक्टरांनी कोरोनावर मात केली. आता हे सर्व डॉक्टर पुन्हा कामावर परतलेत. 

महत्वाची बातमी : मुंबईत पावसाची जोरदार बॅटींग, आज असा असेल पावसाचा जोर 

रुग्णालयाच्या औषध विभागात 66 पदव्युत्तर निवासी डॉक्टरांपैकी 35 जणांना गेल्या तीन महिन्यांत कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यापैकी २६ जण कामावर रुजू झाले असून ५ जणांवर अद्यापही उपचार सुरू आहेत. तर  चार जण क्वांरटाईन आहेत. हे सर्व जण पुन्हा कामावर येण्यास उत्सुक आहेत. आतापर्यंत सायन रुग्णालयातील सुमारे 133 डॉक्टर आणि  56  नर्सेंना कोरोना व्हायसरची लागण झाली. त्यापैकी 85 हे निवासी डॉक्टर आहेत.

धक्कादायक! वांद्रे-वरळी सी लिंकवर 25 वर्षीय तरुणाची आत्महत्या 

डॉक्टर विजय पंडित यांच्यावर तब्बल ३७ दिवस सेव्हन हिल्स रुग्णालयात घालवले. पंडित यांची १२ वेळा चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. तेथे त्यांना 15 मे रोजी दाखल करण्यात आले होते. ते 23 जून रोजी पुन्हा कामावर रुजू झाले. धारावी, अँटॉप हिल आणि वडाळासारख्या दाट वस्ती असलेल्या भागातील प्रकरणे सायन रुग्णालयात येतात.

26 doctors from Sion Hospital overcome corona resume service


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 26 doctors from Sion Hospital overcome corona resume service