esakal | तुर्भे पोलिसांकडून २६ मोबाईल हस्तगत
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

तुर्भे पोलिसांकडून २६ मोबाईल हस्तगत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : घरफोड्या, चोऱ्या करणाऱ्या एकास तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी (Police) अटक केली आहे. आदित्य प्रेमचंद गुप्ता (Aditya Premchand Gupta) (२४) असे त्याचे नाव असून त्याच्याकडून १ लाख ९१ हजार रुपये किमतीचे चोरीचे २६ मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत.

चोरट्याविरोधात एपीएमसी, रबाळे व डायघर पोलिस ठाण्यात घरफोडी, चोरी व जबरी चोरीचे सहा गुन्हे दाखल आहेत. कळवा येथे राहणाऱ्या आदित्य गुप्ताने ९ सप्टेंबर रोजी पहाटे ३ च्या सुमारास तुर्भे एमआयडीसीतील एका महिलेच्या घरामध्ये घुसून विनयभंग केला होता. तसेच तिचा मोबाईल चोरला होता. याबाबत तुर्भे एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकातील सहायक निरीक्षक पवन नांद्रे व त्यांच्या पथकाने तपास सुरू केला. तांत्रिक पद्धतीने व बातमीदाराच्या गुप्त घटनास्थळ व आजूबाजूच्या परिसरात तपास केला असता आदित्य गुप्ता याची माहिती मिळाली.

हेही वाचा: १० दुचाकी चोरी करणाऱ्या आरोपीस भांडुप पोलिसांनी केली अटक

पोलिसांनी कळवा परिसरात दोन ते तीन दिवस पाळत ठेवून गुप्ताला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने तुर्भेतील महिलेचा विनयभंग करून मोबाईल चोरल्याची तसेच दोन महिन्यापूर्वी सुद्धा त्याच भागात चोरी केल्याचे कबूल केले. त्यानुसार गुन्ह्यातील मोबाईल व इतर ऐवज जप्त करून गुप्ताला अटक केली. त्याच्याकडून तब्बल २६ मोबाईल हस्तगत करण्यात आले.

loading image
go to top