esakal | २६ वर्षीय तरुणाची चोर समजून हत्या
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

२६ वर्षीय तरुणाची चोर समजून हत्या

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अंधेरी : चोर समजून एका २६ वर्षीय तरुणाची जमावाने वेदम मारहाण करून हत्या केल्याची घटना मालाडच्या मालवणी परिसरात घडली. चंद्रकांत जितेंद्र वसावा असे मृत तरुणाचे नाव असून या प्रकरणी मालवणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे.

त्यांना बोरिवली महानगर न्यायालयाने १३ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. २६ सप्टेंबरला मालाडच्या मालवणी भागातील जैन मंदिरासमोरील रस्त्याच्या दुभाजकावर एक अज्ञात तरुण जखमी अवस्थेत पडला होता. त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. शवविच्छेदनावेळी मृताच्या शरीरावर अनेक जखमा दिसून आल्या.

हेही वाचा: Drugs case: 'आर्यनला उद्ध्वस्त करू नका, त्याची मदत करा' म्हणणारी अभिनेत्री ट्रोल

त्यामुळे त्याची हत्या झाल्याचे उघडकीस आल्याने पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्यांविरुद्ध गुन्हा नोंदवला. २६ सप्टेंबरला चंद्रकांत तिथे गेला असता चोर समजून त्याला स्थानिकांनी वेदम मारहाण केली होती..

loading image
go to top