Drugs case: 'आर्यनला उद्ध्वस्त करू नका, त्याची मदत करा' म्हणणारी अभिनेत्री ट्रोल

आर्यनच्या अटकेनंतर बॉलिवूडमधील अनेक कलाकार शाहरुखच्या पाठिशी
Aryan shah rukh khan
Aryan shah rukh khan

Drugs Case : प्रवासी जहाजावर अमली पदार्थ घेऊन गेल्याप्रकरणी एनसीबीने अभिनेता शाहरुख खानचा Shah Rukh Khan मुलगा आर्यनसह Aryan Khan आठ जणांना रविवारी अटक केली. या कारवाईनंतर बॉलिवूडमधल्या अनेक कलाकारांनी शाहरुखला पाठिंबा दर्शविला आहे तर काहींनी आर्यनची साथ दिली आहे. मात्र ही बाब नेटकऱ्यांच्या पसंतीस पडली नाही. आर्यनची मदत करा म्हणून सांगणाऱ्या अभिनेत्री नफिसा अली सोढी यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं आहे. 'आर्यनसाठी मी प्रार्थना करते. त्याची मदत करण्याची गरज आहे. त्याला उद्ध्वस्त करू नका', अशा आशयाची पोस्ट नफिसा यांनी इन्स्टाग्रामवर लिहिली. नफिसा यांच्या पोस्टवर अनेकांनी संताप व्यक्त केला. गुन्हा करणाऱ्या श्रीमंताच्या मुलांना वाचवलं पाहिजे का, असा सवाल नेटकऱ्यांनी केला आहे.

दिग्दर्शक हंसल मेहता यांचा शाहरुखला पाठिंबा

'मुलगा अडचणीत सापडला असताना त्यातून मार्ग काढणं हे पालकांसाठी खूप त्रासदायक असतं. न्यायव्यवस्थेच्या आधी जेव्हा लोक त्याबद्दल निष्कर्ष काढू पाहतात, तेव्हा ते आणखीनच क्लिष्ट होत जातं. हा पालकांच्या आणि पालक-मुलांच्या नातेसंबंधांचा अनादर आहे. त्यांच्यासाठी हे अन्यायकारक आहे. एसआरके मी तुझ्यासोबत आहे', असं ट्विट हंसल मेहता यांनी केलं.

Aryan shah rukh khan
Drugs case: आर्यनचे वकील सतीश मानेशिंदेंची एका दिवसाची फी ऐकून व्हाल थक्क!

अभिनेत्री पूजा भट्ट, सुचित्रा कृष्णमूर्ती यांचंही ट्विट

अभिनेत्री पूजा भट्ट आणि सुचित्रा कृष्णमूर्ती यांसारख्या सेलिब्रिटींनीही शाहरुखला पाठिंबा दर्शविला आहे. पूजाने 'चाहत' तर सुचित्राने 'कभी हा कभी ना' या चित्रपटात शाहरुखसोबत काम केलं होतं. पूजाने ट्विट करत लिहिलं, 'मी तुझ्यासोबत आहे. तुला आमची गरज आहे अशातला भाग नाही. पण तरी माझा पाठिंबा आहे. ही वेळसुद्धा निघून जाईल.'

Aryan shah rukh khan
वर्ल्ड कप ट्रॉफी अडवण्यापासून आर्यनच्या अटकेपर्यंत..समीर वानखेडे यांची कामगिरी

पूजाप्रमाणेच सुचित्रानेही ट्विट करत शाहरुखला साथ दिली. 'मुलांना संकटात पाहण्यापेक्षा कठीण पालकांसाठी काहीही नसतं. सर्वांसाठी प्रार्थना. बॉलिवूडला लक्ष्य करणाऱ्यांना एनसीबीने आतापर्यंत चित्रपट स्टार्सवर टाकलेले छापे लक्षात आहे का? त्यांना काहीही सापडलं नाही आणि काहीच सिद्ध झालं नाही. हा फक्त तमाशा आहे. ही प्रसिद्धीची किंमत आहे,' असं ती म्हणाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com