श्वास घेण्यास त्रास होत होता; तपासल्यावर समजले की हृदयाच्या महाधमनीची झाली होती अवाजवी वाढ

भाग्यश्री भुवड
Monday, 31 August 2020

त्रास वाढू लागल्याने त्याला दम लागायला सुरूवात झाली होती. साधारणतः कोरोनाची लक्षण दिसू लागल्याने भीतीपायी कुटुंबियांनी त्याला जुलै महिन्यात मीरारोड येथील वोक्हार्ट रूग्णालयात दाखल केले.

मुंबई : हृदयाला रक्तपुरवठा करणारी महाधमनीची अवाजवी वाढ झालेल्या किंवा त्यात फुगवटा (अँन्युरिझम) निर्माण झालेल्या मुंबईतील एका 26 वर्षीय तरूणाला व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट शस्त्रक्रियेमुळे नव्याने आयुष्य मिळाले आहे. मीरारोड येथील वोक्हार्ट रूग्णालयात या तरूणावर गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करण्यात आली. 

महाविकास आघाडीचा वाद 'तीन हात नाक्या'वर, काँग्रेसच्या बॅनरमुळे राजकीय खळबळ

राहुल रामचंद्रन (वय 26) असे या तरूणाचे नाव असून गेल्या सहा महिन्यांपासून त्याला श्वास घेताना त्रास जाणवत होता. स्थानिक डॉक्टरांकडून औषधोपचार सुरू होते. परंतु, प्रकृतीत काहीच फरक पडत नव्हता. त्रास वाढू लागल्याने त्याला दम लागायला सुरूवात झाली होती. साधारणतः कोरोनाची लक्षण दिसू लागल्याने भीतीपायी कुटुंबियांनी त्याला जुलै महिन्यात मीरारोड येथील वोक्हार्ट रूग्णालयात दाखल केले. याठिकाणी वैद्यकीय चाचण्या केल्या असता तरूणाला हृदयाला रक्तपुरवठा करणारी मोठ्या धमनीमध्ये अवाजवी वाढ झाल्याचे आणि त्याजवळ असलेली झडप निकामी झाल्याचे निदान झाले.

दुर्दैवी घटना, गॅरेजच्या गाडी धुण्याच्या रॅम्पच्या खड्ड्यात पडून चिमुकलीचा मृत्यू

काय आहे आजार ?
एॅओरटिक अँन्युरिझम हा हृदयाच्या आजाराचा एक प्रकार आहे. यात हृदयाकडून अन्य अवयवांना रक्तपुरवठा करणाऱ्या मोठ्या रक्तवाहिनीमध्ये फुगवटा येतो. मात्र, वोक्हार्ट रूग्णालयातील डॉक्टरांनी तातडीने व्हॉल्व्ह झडप आणि मुख्य रक्तवाहिनीची शस्त्रक्रिया करून तरूणाचे प्राण वाचवले. वैद्यकीय भाषेत याला `एओर्टिक रूट रिप्लेसमेंट सर्जरी` असं म्हणतात. ही हृदयविकाराची एक जटिल शस्त्रक्रिया आहे. यात कृत्रिम व्हॉल्व्ह आणि कृत्रिम रक्तवाहिनीद्वारे एओर्टा नावाची रक्तवाहिनी बदलली जाते. या शस्त्रक्रियेत महाधमनीचा आणि झडपेचा भाग काढून टाकण्यात येतो आणि त्याजागी नवीन झडप बसवली जाते. 

घंटानाद आंदोलनाची छायाचित्रे पाहिल्यावर समजलं की...शिवसेनेचा भाजपला चिमटा

हृदयाच्या धमनीचा तीव्र आजार हा तरूणांमध्ये क्वचितच आढळून येतो. हृदयाकडून शरीराला रक्तपुरवठा करणाऱ्या मोठ्या रक्तवाहिनीमध्ये दोष होता. यामुळे शरीरातील अन्य अवयवांना रक्तपुरवठा व्यवस्थित होत नव्हता. यामुळे हृदयाची कार्यक्षमता खूपच कमी झाली होती. अशा परिस्थितीत अनेकदा धमनी फुटल्यामुळे छातीत रक्तस्त्राव झाल्यामुळे अचानक मृत्यू होण्याचा धोका जास्त असतो. हे लक्षात घेऊन तातडीने हृदयावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. 
- डॉ. उपेंद्र भालेराव, कार्डिओव्हस्कुलर आणि थोरॅसिक सर्जन, वोक्हार्ट रूग्णालय, मीरारोड

---
संपादन : ऋषिराज तायडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 26 years youth facing difficulties in breathing, after checkup founds major aortic problem