esakal | दिवसभरात राज्यात पुन्हा कोरोनाचं अक्राळ विक्राळ स्वरुप, इतके रुग्ण दगावले
sakal

बोलून बातमी शोधा

corona

बऱ्या झालेल्या 821 रुग्णांना घरी पाठवण्यात आले; राज्यात आतापर्यंत एकूण 13,404 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 

दिवसभरात राज्यात पुन्हा कोरोनाचं अक्राळ विक्राळ स्वरुप, इतके रुग्ण दगावले

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई : राज्यात शनिवारी कोरोनाच्या 2608 नवीन रुग्णांची नोंद झाल्यामुळे बाधितांची संख्या 47,190 झाली आहे. आणखी 60 रुग्ण दगावल्याने मृतांचा आकडा 1577 वर पोहोचला आहे. बऱ्या झालेल्या 821 रुग्णांना घरी पाठवण्यात आले; राज्यात आतापर्यंत एकूण 13,404 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 

नक्की वाचा : कौतुकास्पद! दोन महिन्यात तब्बल 10 हजार नागरिकांची तपासणी करणारा योद्धा; वाचा सविस्तर

सध्या राज्यात 32,201 अॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोनामुळे आणखी 60 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. मुंबईत 40, पुण्यात 14,  सोलापुरात दोन आणि वसई-विरार, सातारा, ठाणे व नांदेड शहरात प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला. त्यापैकी 42 रुग्ण मागील 24 तासांत दगावले, तर उर्वरित मृत्यू मागील पंधरवड्यातील आहेत. मृतांमध्ये 41 पुरुष आणि 19 महिला आहेत. मृतांपैकी 29 रुग्ण 60 वर्षे किंवा त्यावरील, 24  रुग्ण 40 ते 59 वयोगटातील आणि सात रुग्ण 40 वर्षांखालील होते. त्यांच्यातील 36 रुग्णांना (60 टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग असे अतिजोखमीचे आजार होते. कोव्हिड-19 मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता 1577 वर गेली आहे. 

महत्वाची बातमी : कोरोना झाल्यास पोलिसांवर तातडीने उपचार होणार, महाराष्ट्र कुटूंब आरोग्य योजनेत कोव्हिडचा समावेश

  • थ्रोट स्वाब तपासणी : 3,48,026
  • निगेटिव्ह : 2,98,696 
  • पॉझिटिव्ह : 47,190 
  • क्लस्टर कंटेनमेंट झोन : 2345
  • सर्वेक्षण पथके : 16,414 
  • लोकसंख्येची पाहणी : 65.91 लाख 
  • बरे झालेले रुग्ण :13,404
  • होम क्वारंटाईन : 4,85,623
  • संस्थात्मक क्वारंटाईन:  33,545

2608 new patients of corona in maharashtra, number of total corona positive is over 47 thousand

loading image